Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पंजाब किंग्ससमोर प्लेऑफचं मोठं आव्हान; आजच्या सामन्यावर सर्व काही अवलंबून
ताज्या बातम्या

पंजाब किंग्ससमोर प्लेऑफचं मोठं आव्हान; आजच्या सामन्यावर सर्व काही अवलंबून

PBKS Playoff Equation
66

PBKS Playoff Equation: आज (14 मे) आयपीएल 2026 मधील 58वा सामना पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. मात्र पंजाब किंग्ससाठी हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. जर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्स आजचा सामना गमावला, तर संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल का? जाणून घेऊया पंजाबचे प्लेऑफ समीकरण.

आज मुंबईविरुद्ध हरल्यास पंजाब प्लेऑफमधून बाहेर पडणार?

पंजाब किंग्सचा हा हंगामातील 12वा सामना असेल. संघाने आतापर्यंत 11 सामने खेळले असून त्यापैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 4 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. या कामगिरीसह पंजाबकडे 13 गुण आणि +0.428 नेट रनरेट आहे. संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.जर आज मुंबई इंडियन्सविरुद्ध पंजाबचा पराभव झाला, तर 12 सामन्यांनंतर संघाकडे 13 गुणच राहतील. अशा परिस्थितीत प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पंजाबला उर्वरित दोन्ही सामने जिंकून 17 गुणांपर्यंत पोहोचणे आवश्यक असेल.सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांनी 16-16 गुण मिळवले आहेत. हे संघ अनुक्रमे गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.दुसरीकडे, जर पंजाबने आज मुंबईविरुद्ध विजय मिळवला, तर प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग अधिक सोपा होईल. विजयासह पंजाबकडे 15 गुण होतील आणि संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचू शकतो.

पाऊस पडून सामना रद्द झाला तर?

जर पावसामुळे सामना रद्द झाला, तर पंजाबला त्याचा फायदा होईल. सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिला जाईल. त्यामुळे पंजाबकडे 12 सामन्यांनंतर 14 गुण होतील. त्यानंतर उर्वरित दोन्ही सामने जिंकून पंजाब 18 गुणांसह प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करू शकते.आता आजच्या सामन्यात पंजाब किंग्स कशी कामगिरी करते, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

पंजाब किंग्स:- श्रेयस अय्यर (कप्तान), प्रियांश आर्य, हरनूर सिंह, प्रभसिमरन सिंह, मिचेल ओवेन, नेहल वढेरा, अजमतुल्लाह उमरजई, मार्को यानसन, मुशीर खान, शशांक सिंह, मार्कस स्टोइनिस, सूर्यांश शेडगे, अर्शदीप सिंह, जेवियर बार्टलेट, युजवेंद्र चहल, लॉकी फर्ग्यूसन, हरप्रीत बराड़, विजयकुमार विशाक, यश ठाकुर, कूपर कोनोली, बेन ड्वार्शियस, पाइला अविनाश, विष्णु विनोद, प्रवीण दुबे, विशाल निषाद।

मुंबई इंडियंस:- नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, रयान रिकेल्टन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कप्तान), राज बावा, विल जैक, कॉर्बिन बॉश, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, अश्विनी कुमार, जसप्रीत बुमराह, दीपक चाहर, मयंक मारकंडे, शार्दुल ठाकुर, क्विंटन डीकॉक, दानिश मालेवार, अथर्व अंकोलेकर, एएम ग़ज़नफ़र, मयंक रावत, रघु शर्मा, मोहम्मद सलाउद्दीन इजहार, रॉबिन मिंज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts