Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • महिलांमध्ये PCOS का वाढतोय? जाणून घ्या सुरुवातीची ही लक्षणे, कारणे आणि उपाय
लाईफस्टाईल

महिलांमध्ये PCOS का वाढतोय? जाणून घ्या सुरुवातीची ही लक्षणे, कारणे आणि उपाय

PCOS Symptoms in Women: बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये PCOSची समस्या वाढताना दिसत आहे. वजन वाढणे आणि हार्मोनल बदल यामागची मुख्य कारणे कोणती आणि सुरुवातीची लक्षणे कशी ओळखावीत, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. चला तर पाहुयात आजच्या खास लेखात.

बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये PCOSची समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. अनियमित दिनचर्या, अपुरी झोप, ताणतणाव, फास्ट फूडचे वाढते सेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव याचा थेट परिणाम महिलांच्या हार्मोनल आरोग्यावर होत आहे. परिणामी वजन वाढणे, मासिक पाळी अनियमित होणे, चेहऱ्यावर मुरूम येणे, केस गळणे किंवा अवांछित केस वाढणे अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे अनेक महिला सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे पुढे ही समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते.

हेही वाचा: आरक्षणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता ‘या’ उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून नोकरी नाही!

PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा केवळ हार्मोनल विकास नसून तो महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम करू शकतो. वेळेत योग्य उपचार न घेतल्यास गर्भधारणेत अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र योग्य आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीत बदल केल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात ठेवता येऊ शकते.

वजन वाढणे आणि हार्मोनल बदल यामागची मुख्य कारणे कोणती, PCOSची सुरुवातीची लक्षणे कशी ओळखावीत आणि त्यापासून बचावासाठी कोणते उपाय करावेत, याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. चला तर पाहूया आजच्या खास लेखात.

PCOS होण्यामागील प्रमुख कारणे (Polycystic Ovary Syndrome)

तज्ज्ञांच्या मते, इन्सुलिन रेसिस्टन्स हे PCOSचे एक प्रमुख कारण मानले जाते. या स्थितीत शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही, ज्यामुळे हार्मोन्समध्ये बदल होतात. त्याचा परिणाम अंडाशयांच्या कार्यावर होतो.

याशिवाय खालील कारणांमुळेही PCOSचा धोका वाढू शकतो

वाढते वजन
असंतुलित आहार
तणाव
व्यायामाचा अभाव
आनुवंशिक कारणे

गर्भधारणेवर कसा होतो परिणाम?

PCOSमुळे नियमित अंडोत्सर्जन होत नाही. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होऊ शकते. अनेक महिलांना यामुळे नैसर्गिकरित्या कंसीव्ह होण्यात अडचणी येतात.

तथापि, योग्य उपचार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे PCOS नियंत्रणात ठेवता येतो. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतल्यास अनेक महिलांना सुरक्षित गर्भधारणा शक्य होते.

PCOS नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय

नियमित व्यायाम करा
वजन नियंत्रणात ठेवा
संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या
जंक फूड आणि गोड पदार्थ कमी करा
नियमित आरोग्य तपासणी करा

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts