Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • पुणे हादरलं! आरोपींना अटक करायला गेले अन् पोलिसांवरच झालं फायरिंग, घडला थरारक प्रकार
Pune

पुणे हादरलं! आरोपींना अटक करायला गेले अन् पोलिसांवरच झालं फायरिंग, घडला थरारक प्रकार

Pune Crime | पुणे (Pune) हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते पण याच विद्येच्या माहेरघरात गुन्ह्यांचं (Crime) सत्र वाढताना दिसत आहे. पुण्यात दिवसेंदिवस विविध गुन्हे घडताना दिसत आहेत. एकिकडे पुण्यात कोयता गँगने भितीचे वातावरण निर्माण केले आहे. तर आज पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगच्या काही शुटर्सनी एका फर्निचर मॉलवर गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनांमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथील सोने सांगवी येथे पोलिसांवर गोळीबार झाल्याचा थरारक प्रकार समोर आला आहे.

हेही वाचा – सुनील तटकरे प्रदेशाध्यक्षपदावरून हटणार की राहणार? राष्ट्रवादीने केला मोठा खुलासा

पुण्यात नेमकं घडलं काय? पोलिसांवर गोळीबार कसा झाला?

सोने सांगवी येथे एका गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यादरम्यान पोलिसांनी देखील स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तर देत हवेत गोळीबार केला.

मिळालेल्या माहितीनुसार, एका गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस दल सोने सांगवी परिसरात गेले होते. संबंधित परिसरात सापळा रचत पोलीस तिथे गेले. मात्र, आरोपींना पोलीस आपल्या दिशेने येत असल्याचं समजताच त्यांनी पोलिसांवर थेट गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यानंतर स्वत:च्या बचावासाठी पोलिसांनी देखील हवेत गोळीबार करण्यास सुरूवात केली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, सुदैवानं या हल्ल्यात कोणीही जखमी झालेलं नाही.

या हल्ल्यादरम्यान आरोपींनी पोलिसांना गुंगारा देत शेजारी असलेल्या ऊसाच्या शेतात पळ काढला आणि तिथून त्यांनी पलायन केलं. तर पोलीस शेतात जाऊन आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत असून ते शेत घनदाट असल्यामुळे त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. तर या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, अतिरिक्त फौटफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी ऊसाच्या शेतात लपलेल्या आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts