• Home
  • राजकारण
  • अखेर फॉर्म्युला ठरला! विजय सरकारमध्ये खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणाला मिळालं कोणतं खातं?
Top News

अखेर फॉर्म्युला ठरला! विजय सरकारमध्ये खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणाला मिळालं कोणतं खातं?

vijay 2

Tamil Nadu Cabinet Ministers List 2026 | मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय (CM Joseph Vijay) यांच्या नेतृत्वाखालील तामिळनाडूतील (Tamil Nadu) नवनिर्वाचित सरकारने मंत्र्यांमध्ये खातेवाटप केले आहे. तामिळनाडू लोक भवनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मुख्यमंत्री विजय यांनी गृह, पोलीस आणि सार्वजनिक प्रशासन यांसारखी महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली आहेत. तर बाकी 10 मंत्र्यांना त्यांची संबंधित खाती सोपवण्यात आली आहेत.

हेही वाचा – “2 कोटी तरूणांचे भविष्य उद्ध्वस्त झाले…”, राहुल गांधी आक्रमक, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली मागणी

टीव्हीके (TVK) सरकारने केलेले हे खातेवाटपाचे त्यांने एक मोठे प्रशासकीय पाऊल आहे. या सरकारने राज्यातील द्रमुक (DMK) आणि एआयएडीएमके (AIDMK) यांच्यातील अनेक दशकांच्या आळीपाळीच्या सत्तेची परंपरा संपुष्टात आणली आहे.

विजय यांच्या टीव्हीके पक्षाने विधानसभा निवडणूकीत एकूण 108 जागा जिंकून मोठा विजय मिळवला. तर सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना आघाडीतील भागीदारांचा पाठिंबा मिळाला आणि तामिळनाडूत सत्ता स्थापन करण्यात यश आले. त्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला विजय यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच आता या नवीन तामिळनाडू मंत्रिमंडळात 10 मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री विजय यांनी स्वत:कडे गृह, पोलीस आणि सार्वजनिक प्रशासन तसेच महिला कल्याण आणि युवा विकास ही खाती ठेवली आहेत.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री विजय यांनी क्रीडा विकास हे एक स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आहे. तर अधव अर्जुन यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली असून ते क्रीडा विकास विभाग देखील सांभाळणार आहेत. तर के.जी. अर्जुन राज हे आरोग्य मंत्री असणार आहेत, तर के. ए. सेंगोत्तैयन यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच इतर मंत्र्यांकडेही ग्रामीण विकास, शिक्षण, उद्योग, ऊर्जा, अन्न व नागरी पुरवठा आणि नैसर्गिक संसाधने यांसारखी खाती सोपवण्यात आली आहेत.

कोणाला मिळालं कोणतं खातं?

मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय – सार्वजनिक प्रशासन, सामान्य प्रशासन, पोलीस, महिला कल्याण आणि युवा विकास विभाग

आधव अर्जुन – सार्वजनिक बांधकाम विभाग आणि क्रीडा विकास विभाग

के.ए. सेंगोट्टय्यान: अर्थमंत्री

एन. आनंद –  ग्रामीण विकास विभाग

के.जी. अरुणराज – आरोग्य मंत्री

सीटीआर निर्मल कुमार – ऊर्जा संसाधने आणि कायदा मंत्रालय

एस. कीर्तना – उद्योग विभाग

टी.के. प्रभू – नैसर्गिक संसाधन मंत्री

राजमोहन – शालेय शिक्षण, माहिती व प्रसिद्धी आणि तमिळ विकास

पी. वेंकटरामन – अन्न व नागरी पुरवठा विभाग

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts