• Home
  • राजकारण
  • “2 कोटी तरूणांचे भविष्य उद्ध्वस्त झाले…”, राहुल गांधी आक्रमक, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली मागणी
Top News

“2 कोटी तरूणांचे भविष्य उद्ध्वस्त झाले…”, राहुल गांधी आक्रमक, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली मागणी

gandhi

Rahul Gandhi | सध्या नीट-यूजी 2026 परीक्षेच्या पेपरफुटीमुळे (NEET-UG 2026 Paper Leak) अनेक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये आता पेपरफुटी प्रकरणावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. नीट-यूजी परीक्षेच्या पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – ‘तुला घरी यावंच लागेल, तुझ्यासाठी 2 पेपर काढलेत’; सतत फोनवर त्रास देणाऱ्या प्राध्यापकाचा विद्यार्थिनीनेच केला पर्दाफाश, ऐका व्हायरल ऑडिओ

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी यांनी 22 लाख नीट विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदींनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तात्काळ मागावा, अशी मागणीही केली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ राहुल गांधींनी ट्विट केला आहे.

राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल ‘एक्स’वर एक व्हिडीओ शेअर करून नीट पेपरफुटीवरून सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 22 लाख विद्यार्थ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून नीट परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली होती, पण आता त्यांची मेहनत वाया गेली आहे. संपूर्ण देशाला माहीत आहे की परीक्षेच्या दोन दिवस आधी व्हॉट्सॲपवर नीट पेपर वितरित केला जात होता. भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात की त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही.

समितीने विरोधी पक्षाच्या सदस्यांना समितीवर घेण्याची शिफारस केली होती, पण त्यांनी ती कचरापेटीत टाकली. ते म्हणाले की, विरोधी पक्षाचे सदस्य समितीवर बसले आहेत. त्याला काही अर्थ नाही, त्याची गरज नाही. सत्य हे आहे की तुम्ही भारताच्या गाभ्याला, त्याच्या केंद्रालाच नुकसान पोहोचवले आहे. हे एक साटेलोटे आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.

पुढे ते म्हणाले की, या देशात आत्तापर्यंत 80 वेळा पेपरफुटी झाल्यामुळे 2 कोटी तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे. पंतप्रधानांनी धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश द्यावेत आणि दोषी आढळलेल्यांना अटक करून तुरुंगात टाकावे, अशी मागणीही राहुल गांधीनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts