• Home
  • राजकारण
  • सुनील तटकरे प्रदेशाध्यक्षपदावरून हटणार की राहणार? राष्ट्रवादीने केला मोठा खुलासा
Top News

सुनील तटकरे प्रदेशाध्यक्षपदावरून हटणार की राहणार? राष्ट्रवादीने केला मोठा खुलासा

sunil tatkare

Sunil Tatkare | मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पक्षात अंतर्गत नाराजी वाढत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. तर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि अनेक बड्या नेत्यांमध्ये मतभेद झाल्याचंही म्हटलं जात आहे. अशातच आता या सर्व चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा – “2 कोटी तरूणांचे भविष्य उद्ध्वस्त झाले…”, राहुल गांधी आक्रमक, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अविनाश आदिक (Avinash Adik) आणि उमेश पाटील (Umesh Patil) यांनी पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे. यामध्ये अविनाश आदिक यांनी सांगितलं की, मी पक्षाचा राष्ट्रीय सचिव असून मी मागील अनेक दिवसांपासून दिल्लीला जात आहे आणि कार्यालयाचं काम सांभाळत आहे. मात्र, मी काही आठवडे दिल्लीमधील पक्षकार्यालयात गेलो नव्हतो आणि काल मी तिथे गेलो तर तिथे माझ्या नावाने एक बातमी आली होती की, मी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या कार्यालयात येण्यास बंदी घातली आहे. खरं सांगायचं तर ही बातमी खोटी असून माझ्या विरोधात काही लोकांनी हे सर्व केलं आहे, असं अविनाश आदिक यांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांनी अजित पवारांचा केला छळ…, उमेश पाटलांचे गंभीर आरोप

पुढे उमेश पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्या जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, अजित पवारांचा फायदा उचलण्याचा रोहित पवार प्रयत्न करत आहेत. रोहित पवारांनी अजित पवारांच्या पक्षाची चिंता करू नये. बारामतीवर रोहित पवारांचा डोळा आहे. त्यांनी अजित पवारांचा सर्वात जास्त छळ करण्याचा प्रयत्न केला आहे, असे गंभीर आरोप उमेश पाटील यांनी केले.

सुनील तटकरेंचं प्रदेशाध्यक्ष राहणार की जाणार?

सुनील तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत उमेश पाटलांनी मोठा खुलासा केला. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत एका वृत्तपत्रामध्ये काही चुकीच्या बातम्या देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीमध्ये प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष आहेत आणि ते कायम राहणार आहेत. तसेच सुनील तटकरे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते कायम राहणार आहेत, याची सर्व पत्रकारांनी नोंद घ्यावी, असं सांगत उमेश पाटलांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts