Breaking News :
  • Home
  • देश
  • ‘तुला घरी यावंच लागेल, तुझ्यासाठी 2 पेपर काढलेत’; सतत फोनवर त्रास देणाऱ्या प्राध्यापकाचा विद्यार्थिनीनेच केला पर्दाफाश, ऐका व्हायरल ऑडिओ
Top News

‘तुला घरी यावंच लागेल, तुझ्यासाठी 2 पेपर काढलेत’; सतत फोनवर त्रास देणाऱ्या प्राध्यापकाचा विद्यार्थिनीनेच केला पर्दाफाश, ऐका व्हायरल ऑडिओ

Professor Arrested in Lucknow

Professor Arrested in Lucknow: सध्या राज्यात NEET Exam Paper Leak प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. “तुझ्यासाठी दोन पेपर फोडून ठेवले आहेत, तुला घरी यावंच लागेल,” अशा प्रकारचा दबाव प्राध्यापक विद्यार्थिनीवर टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पहा नेमकं काय घडलं…

लखनौमधील एका विद्यापीठात धक्कदायक प्रकार समोर आला असून, विद्यार्थिनीवर दबाव टाकत पेपर लीक केल्याचा आरोप एका सहायक प्राध्यापक वर करण्यात आला आहे. विद्यार्थिनीला वारंवार फोन करून घरी भेटण्यासाठी दबाव घालत असल्याची माहिती समोर आली. रात्री उशिरा हजरातगंज पोलीस स्टेशनमध्ये ऑडिओ क्लिप सादर करून प्राध्यापक डॉ. परमजीत सिंह विरोधात FIR दाखल केला. पोलिसांनी आरोपी प्राध्यापकाला अटक केली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्राध्यापकाने B.sc अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीशी वारंवार संपर्क साधत तिच्यासाठी दोन विषयांचे पेपर मिळवल्याचा दावा केला. “तुझ्यासाठी पेपर तयार ठेवले आहेत, घरी येऊन घेऊन जा,” असे सांगत आरोपीने १४ आणि १५ मी रोजी रात्री विद्यार्थिनीला फोन करून भेटीसाठी दबाव टाकत होता. मात्र विद्यार्थिनीने त्याच्या बोलण्याला नकार देत संपूर्ण संभाषण रेकार्ड केले.

हेही वाचा: इंस्टाग्राममध्ये आलं ‘Instants’ फीचर; जाणून घ्या नेमकं काय आहे अन् कसं काम करतं?

ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ

विद्यार्थिनीने रेकॉर्ड केलेले ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ चौकशी सुरू केली. संबंधित ऑडिओ पोलिसांकडे सुपर्द करण्यात आला असून त्यानंतर आरोपी प्राध्यापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विद्यार्थिनीवर मानसिक दबाव

संभाषणात आरोपी प्राध्यापक विद्यार्थिनीला भावनिकरीत्या प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं. तो सतत भेटण्याचा आग्रह करत होता. तसेच “मी तुझ्यासाठी खूप काही केलं आहे,” तू मला भेटायलाच हवं,” अशा प्रकारची वक्तव्यं करत दबाव निर्माण केला जात होता.

विद्यार्थिनीने मात्र स्पष्टपणे सांगितले की तिला पेपर नको असून ती त्याला भेटणार नाही. तिने आपल्या सुरक्षितेच्या दृटीने संपूर्ण सवांद रेकॉर्ड केला आणि योग्य वेळी तो समोर आणला.

विद्यापीठ प्रशासनाची कारवाई

घटना उघड झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आरोपी प्राध्यापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. विद्यापीठाकडूनही अंतर्गत चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

या प्रकरणामुळे परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शिक्षक-विद्यार्थी नात्यावरील विश्वास यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थिनीच्या धाडसामुळे हा प्रकार उघडकीस आला असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts