Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • 12वी आणि ITI उत्तीर्णांसाठी NPCIL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 255 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू
Top News

12वी आणि ITI उत्तीर्णांसाठी NPCIL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 255 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

NPCIL Recruitment 2026: जर तुम्ही १२वी उत्तीर्ण असाल आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL) ने तब्बल २५५ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. चला तर जाणून घेऊयात याबाबत अधिक माहिती

बारावी किंवा ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी क्षेत्रात करिअर करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL) ने कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पासाठी कॅटेगरी-II स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

आणखी वाचा: 1000 वर्षांनंतर मायदेशी परतला चोलांचा वारसा; 21 तांब्याच्या पट्टिकांचा इतिहास काय आहे?

अर्ज प्रक्रिया ८ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल आणि २९ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत खुली राहणार आहे. उमेदवारांनी या www.npcil.nic.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा.

किती पदांसाठी भरती?

या भरतीअंतर्गत एकूण २५५ रिक्त पदे भरती जाणार आहेत. विविध तांत्रिक ट्रेड्समध्ये संधी उपलब्ध असून त्यात प्लांट ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, टर्नर, मशीनिस्ट आणि वेल्डर या पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता

प्लांट ऑपरेटर पदासाठी

उमेदवाराने फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित विषयांसह 12वी परीक्षा किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

इतर तांत्रिक पदांसाठी

10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून विज्ञान आणि गणित विषयांत किमान 50 टक्के गुण असावेत. तसेच संबंधित ट्रेडमधील दोन वर्षांचा ITI कोर्स पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा

29 जून 2026 पर्यंत उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्क किती?

सामान्य, OBC (NCL) आणि EWS प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 ठेवण्यात आले आहे.
महिला, SC/ST, दिव्यांग, माजी सैनिक आणि NPCIL कर्मचाऱ्यांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
निवड कशी होणार?

भरती प्रक्रियेत उमेदवारांना प्रारंभिक परीक्षा, अ‍ॅडव्हान्स परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी या टप्प्यांतून जावे लागेल. परीक्षा हिंदी, इंग्रजी आणि तमिळ या भाषांमध्ये घेतली जाणार आहे.

स्टायपेंड आणि संभाव्य पगार

प्रशिक्षणाच्या पहिल्या वर्षात उमेदवारांना दरमहा 20,000 रु. स्टायपेंड मिळेल.
दुसऱ्या वर्षात स्टायपेंड वाढून 22,000 रु. प्रति महिना होईल.

याशिवाय 3,000 रु. पुस्तक भत्ता दिला जाईल.

प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना टेक्निशियन पदावर नियुक्ती मिळू शकते. या पदासाठी बेसिक पे 21,700 असून भत्ते मिळून मासिक वेतन सुमारे 34,720 पर्यंत जाऊ शकते.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts