• Home
  • Top News
  • 1000 वर्षांनंतर मायदेशी परतला चोलांचा वारसा; 21 तांब्याच्या पट्टिकांचा इतिहास काय आहे?
Top News

1000 वर्षांनंतर मायदेशी परतला चोलांचा वारसा; 21 तांब्याच्या पट्टिकांचा इतिहास काय आहे?

Chola Copper Plate

Return of Chola Copper Plates from Netherlands to India: भारतीय इतिहासासाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरला आहे. 11व्या शतकातील चोल साम्राज्याच्या काळातील मौल्यवान तांब्याच्या पट्टिका नेदरलँड्समधून भारतात परत आणल्या जात आहेत. चला तर जाणून घेऊया याचे महत्त्व आणि इतिहास.

चोल काळातील अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या तांब्याच्या पट्टीका अखेर भारतात परत आणण्यात आल्या आहेत. सुमारे ११ व्या शतकातील हा वारसा नेदरलँड्समध्ये ‘लीडेन प्लेट्स’ या नावाने ओळखला जात होता. भारताने २०१२ पासून या ऐतिहासिक वस्तू परत मिळवण्यासाठी सातत्याने प्रयन्न केले होते.

आणखी वाचा: एका बड्या मंत्र्यांच्या मुलावर POCSO अंतर्गत गुन्हा; पाहा संपूर्ण प्रकरण नेमकं काय?

नेदरलँड्स सरकारने पट्टीका भारताकडे सुपूर्त केल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युरोप दौऱ्यादरम्यान नेदरलँड्स सरकारने या पट्टीका अधिकृतपणे भारताकडे सुपूर्त केल्या. या हस्तांतरण सोहळ्यात नेदरलँड्सचे पंतप्रधान रॉब जेटन उपस्थित होते.

तमिळ भाषेत शिलालेख

या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी या घटनेला भारतासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले, त्यांच्या मते, या ताम्रपटांमध्ये चोल साम्राज्याच्या इतिहासाचा मौल्यवान कागदपत्र जतन आहे. एकूण २१ मोठ्या आणि ३ लहान अशा २४ पट्टिकांचा हा संग्रह असून त्यावर प्रामुख्याने तमिळ भाषेत शिलालेख कोरलेले आहेत.

चोल साम्राज्याची संस्कृती

या ताम्रपटांमध्ये सम्राट राजेंद्र चोल पहिला यांचा उल्लेख असून त्यांना त्यांच्या वडील राजराज चोल पहिला यांनी दिलेल्या मौखिक आश्वासनाची अधिकृत नोंद आहे. याशिवाय चोल साम्राज्याची प्रशासकीय व्यवस्था, संस्कृती आणि नौदल सामर्थ्य यांचेही उल्लेख यात आढळतात.

18व्या शतकात

इतिहासानुसार, या पट्टिका 18व्या शतकात फ्लोरेंटियस कॅम्पर यांनी नेदरलँड्समध्ये आणल्या होत्या. त्यानंतर त्या लीडन विद्यापीठात सुरक्षितरीत्या जतन करण्यात आल्या आणि संशोधनासाठी उपलब्ध होत्या.

किती किलो वजन आहे?

सुमारे 30 किलो वजनाचा हा ऐतिहासिक संग्रह चोल राजमुद्रेने जोडलेला आहे. यामध्ये संस्कृत आणि तमिळ अशा दोन्ही भाषांतील शिलालेखांचा समावेश आहे.

या ऐतिहासिक वारशाच्या पुनरागमनामुळे भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीला नवा उजाळा मिळाला असून चोल साम्राज्याचा गौरव पुन्हा एकदा जागतिक स्तरावर अधोरेखित झाला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts