Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • दिल्लीत अग्नितांडव! इमारतीला लागली भीषण आग, बचावकार्यासाठी उडाली धावपळ
Top News

दिल्लीत अग्नितांडव! इमारतीला लागली भीषण आग, बचावकार्यासाठी उडाली धावपळ

Delhi Fire | दिल्लीत (Delhi) एका इमारतीला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली  आहे. दिल्लीतील शाहदरा परिसरात एका चार मजली निवासी इमारतीला अचानक भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती की सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. जेव्हा या इमारतीला आग लागली तेव्हा अनेक लोक आतमध्ये अडकले होते. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती.

हेही वाचा – हमासच्या टॉप कमांडरचा खात्मा; इस्रायलने 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा घेतला बदला

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अंदाजे 12:03 वाजता शाहदरा येथील मानसरोवर पार्कमधील एका चार मजली निवासी इमारतीला आग लागल्याची घटना घडली. तर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी तीन वाहने रवाना केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान दाखवत आत अडकलेल्या एका अल्पवयीन मुलीसह इतर महिलांसह नऊ जणांना सुखरूप बाहेर काढले. तर धुरामुळे श्वास घेण्यास तीव्र त्रास झालेल्या सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंग परिसरात आग लागली, जिथे मोठ्या प्रमाणात घरगुती सामान ठेवलेले होते. ही आग झपाट्याने पसरली आणि संपूर्ण इमारत धुराने भरून गेली होती. तसेच जेव्हा आग लागली तेव्हा बहुतेक रहिवासी झोपलेले होते. त्यामुळे धुरामुळे लोकांचा श्वास गुदमरत असताना, इमारतीत किंकाळ्यांचा कल्लोळ उसळला. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. तर अग्निशमन दलाने आपल्या जीवाची पर्वा न करता इमारतीच्या विविध मजल्यांवर अडकलेल्या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

इमारतीला लागलेल्या आगीमुळे मोठा धूर सगळीकडे पसरला होता. तर इमारतीत अडकलेल्या अनेक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि काही लोक जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीनं उपचारासाठी दिल्लीतील गुरु तेग बहादूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts