• Home
  • मनोरंजन
  • प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरने वयाच्या 30 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; सोशल मीडियावर खळबळ, मृत्यूचं कारण चर्चेत
Top News

प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरने वयाच्या 30 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; सोशल मीडियावर खळबळ, मृत्यूचं कारण चर्चेत

KARINA KAISAR

Content Creator Kaarina Kaisar Death | मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर करीना कायसरचं (Kaarina Kaisar) निधन झालं आहे. वयाच्या 30 वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. तर करीनाच्या निधनानं तिच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चेन्नईतील वेल्लोर येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री करीनाचं निधन झालं.

हेही वाचा – दिल्लीत अग्नितांडव! इमारतीला लागली भीषण आग, बचावकार्यासाठी उडाली धावपळ

करीनाच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

मागील काही दिवसांपासून करीना ही यकृताच्या गंभीर समस्येने त्रस्त होती. तर तिचे वडील आणि माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू मोहम्मद कायसर हमीद यांनी शनिवारी संध्याकाळी सोशल मीडियावर आपल्या मुलीच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला.

करीना कैसरचे पती मोहम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी करीनाला अचानक ताप आला होता. नंतर असं आढळून आलं की तिला एक गंभीर आरोग्य समस्या होती. तर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तिला हिपॅटायटीस ए आणि ई संसर्गामुळे तिच्या यकृताने पूर्णपणे काम करणे थांबवले होते, असं सांगितलं. त्यामुळे करीनाची प्रकृती झपाट्याने खालावत गेली होती. त्यामुळे करीनाला चांगल्या उपचारांसाठी विमानाने चेन्नईला नेण्यात आले. वेल्लोर येथील प्रसिद्ध ख्रिश्चन मेडिकल कॉलेज रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी सुरुवातीला तिच्या फुफ्फुसाच्या संसर्गावर उपचार करण्याचा प्रयत्न केला आणि यकृत प्रत्यारोपणाची तयारी करत होते, परंतु सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आणि 15 मे च्या रात्री तिचे निधन झाले.

बांगलादेशमध्ये सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर म्हणून करीना प्रसिद्ध होती. तिचा चाहतावर्गही मोठ्या संख्येत होता. तर तिच्या आकस्मिक निधनामुळे तिचे सहकारी कलाकार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts