Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • गुन्हा
  • पुणे हादरले! बालाजीनगरमध्ये भर चौकात गोळीबार; वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या
Pune

पुणे हादरले! बालाजीनगरमध्ये भर चौकात गोळीबार; वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या

Vanraj Andekar Case Accused Brother Murder: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र असताना आता पुन्हा एकदा टोळी संघर्षाने डोकेवर काढले आहे. वनराज आंदेकर खूप प्रकरणातील आरोपीच्या भावाची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

एकीकडे चार वर्षांच्या चिमुकलीवर ६५ वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसरीकडे नवले पुल परिसरात जुन्या वादातून एका रिक्षाचालकाची भरदिवसा हत्या करण्यात आली. त्यातच आता वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपीच्या भावाची भर चौकात गोळ्या झाडून हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. या सलग घटनांमुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, “नेमकं पुण्यात काय सुरू आहे?” असा सवाल नागरिक विचारत आहेत. चला तर जाणून घेऊयात वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या प्रकरण काय आहे.

हेही वाचा: 

शहरात भीतीचे वातावरण

ही धक्कादायक घटना पुण्यातील बालाजीनगर परिसरात घडली. बसस्टँडजवळ भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण
झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना टोळी संघर्षातून घडल्याचे समोर येत आहे.

आंदेकर–कोमकर टोळी संघर्ष पुन्हा पेटला

पुण्यातील आंदेकर आणि कोमकर टोळी यांच्यातील वाद पुन्हा तीव्र झाल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. याच टोळी संघर्षातून यापूर्वीही गंभीर गुन्हे घडले असून, ही या साखळीतील आणखी एक हत्या असल्याचे बोलले जात आहे.

वनराज आंदेकर प्रकरणाचा पार्श्वभूमी

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची काही वर्षांपूर्वी पुण्यातील नाना पेठ परिसरात भर चौकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर दोन्ही गटांमधील वैर अधिकच वाढत गेल्याचे सांगितले जाते.

साखळी हत्यांचा संशय

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या पूर्ववैमनस्यातून आणि टोळी संघर्षातून झाल्याचा संशय आहे. या घटनेनंतर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विविध पथके सक्रिय करण्यात आली आहेत. या प्रकरणात लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

नागरिकांमध्ये चिंता

भरदिवसा घडलेल्या या हत्येमुळे पुण्यातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे शहरातील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts