Pune Crime: पुण्यातील नवले ब्रिज परिसरात एका रिक्षाचालकावर धारदार शाश्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसर भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा व्यवसायाशी संबंधित जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. काही जणांनी संबंधित रिक्षाचालकाला रस्त्यात अडवून त्याच्यावर धारदार हत्याराने वार केल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर जखमी रिक्षाचालक पुलावरून डायरेक्ट खाली रस्तावर कोसळल्याचे दृश्य व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
हेही वाचा: Android 17 पासून Gemini AI पर्यंत; Google I/O 2026 मध्ये मोठे खुलासे होणार, लाईव्ह कुठे पाहाल?
परिसरात तणावाचे वातावरण
ही घटना सकाळच्या वेळी गजबजलेल्या मार्गावर घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे. भरदिवसा अशा प्रकारे हल्ला झाल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पोलिसांची तातडीची कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तपास सुरू करत काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण शोधले जात आहे.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पुण्यातील कात्रज-नवले पूल मार्गावर राजमाता भुयारी मार्गाच्या परिसरात एका व्यक्तीला कोयत्याने जबर मारहाण करीत वरुन खाली ढकलून दिल्याचा व्हिडिओ पाहिला. अशा घटना राजरोसपणे, दिवसाढवळ्या भररस्त्यात होत आहेत. याचाच अर्थ गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. एनसीआरबी’च्या आकडेवारीत…
— Supriya Sule (@supriya_sule) May 19, 2026












