Breaking News :
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता DRDO मध्ये इंटर्नशिपची संधी; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करता येणार
शैक्षणिक बातम्या

ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता DRDO मध्ये इंटर्नशिपची संधी; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करता येणार

DRDO Internship

DRDO Internship 2026: जर तुम्ही पदवी शिक्षण पूर्ण केले असेल आणि सध्या नोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. डीआरडीओ कडून BE/BTech अंतिम वर्षातील विद्यार्थी तसेच MSc (सायन्स/टेक्नॉलॉजी) द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी पेड इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊया अर्ज कुठे आणि कसा करायचा.

संरक्षण संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डीआरडीओ (Defence Research and Development Organisation) कडून नवी पेड इंटर्नशिप जाहीर करण्यात आली आहे. या इंटर्नशिपसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून परीक्षा न घेता शैक्षणिक गुणवत्ता आणि इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाणार आहे. अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2026 सुरू होणार असून 10 जून 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

ही संधी NMRL (Naval Materials Research Laboratory) येथे उपलब्ध असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संशोधन प्रकल्पांवर काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. हा कार्यक्रम सहा महिन्यांचा असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अनुभवी वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाखाली काम करता येईल. अधिक माहितीसाठी तुम्ही drdo.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

हेही वाचा: अक्षय कुमार–अक्षरा सिंह पहिल्यांदाच दिसणार एकत्र पडद्यावर; Welcome to the Jungle’चे ‘घिस घिस घिस’ गाणे रिलीज

इंटर्नशिपची मुख्य माहिती

कालावधी: 6 महिने
स्टायपेंड: 5000 प्रति महिना
एकूण जागा: 20
ठिकाण: अंबरनाथ
अंतिम तारीख: 10 जून 2026

निवड प्रक्रिया: शैक्षणिक गुण + ऑनलाइन इंटरॅक्शन
सुरुवात: 1 जुलै 2026

पात्रता

BE/BTech अंतिम वर्षातील विद्यार्थी
MSc (सायन्स/टेक्नॉलॉजी) दुसऱ्या वर्षातील विद्यार्थी
किमान 65% गुण किंवा 7.0 CGPA आवश्यक
वय मर्यादा: 25 वर्षांपर्यंत

आवश्यक कागदपत्रे

मागील सेमिस्टरची मार्कशीट
आधार कार्ड
कॉलेजचे रेफरन्स लेटर
अपडेटेड बायोडाटा
भरलेला अर्ज फॉर्म

अर्ज कसा कराल?

इच्छुक विद्यार्थ्यांनी डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज फॉर्म डाउनलोड करून सर्व माहिती भरावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ईमेलद्वारे दिलेल्या अधिकृत पत्त्यावर पाठवावी. वेळेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

ही इंटर्नशिप विद्यार्थ्यांना संरक्षण संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवण्याची उत्तम संधी मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts