Silent Exit Trend In Gen Z Workplaces Explained: Gen Z म्हटली की बिनधास्त आणि पटकन शिकणारी पिढी समोर येते. मात्र, सध्या कामाच्या विश्वात मोठे बदल दिसत आहेत. ही पिढी फक्त पगार किंवा पदासाठी नोकरी करत नाही, तर अनुभव, मानसिक समाधान आणि वैयक्तिक आयुष्यालाही महत्त्व देते. याच बदलामुळे ‘Silent Exit’ हा ट्रेंड वाढताना दिसतो आहे. नेमका हा ट्रेंड काय आहे, ते जाणून घेऊया.
Gen Z ही अशी पिढी मानली जाते जी वेगाने शिकते, स्पष्ट बोलते आणि स्वतःच्या अटींवर जगण्यावर विश्वास ठेवते. पण आजच्या बदलत्या कामकाजाच्या जगात त्यांची कामाकडे पाहण्याची दृष्टीही पूर्णपणे बदलताना दिसत आहे. पूर्वीसारखी “एका नोकरीत स्थिर राहणे” ही संकल्पना आता मागे पडत असून, कामातून मिळणारे समाधान, मानसिक शांतात आणि वैयक्तिक आयुष्यातील समतोल यांनी अधिक महत्व दिले जात आहे. याच बदलत्या मानसिकतेतून “Silent Exit किंवा Ghost Resignation” सारखे ट्रेंड समोर येत आहेत, जे पारंपरिक ऑफिस संस्कृतीला नवीन प्रश्न विचारत आहेत.
हेही वाचा : शिखांवरील अत्याचारांचा निषेध कायम; फडणवीस म्हणाले की….
Ghost Resignation म्हणजे काय?
साधारणपणे एखादा कर्मचारी नोकरी सोडताना आपल्या वरिष्ठांना माहिती देतो, राजीनामा सादर करतो आणि नोटीस कालावधी पूर्ण करतो. मात्र Ghost Resignation मध्ये कर्मचारी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक कामावर येणे बंद करतो. कंपनीशी संपर्क तोडला जातो आणि त्याच्या जाण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाही.
तरुण कर्मचारी हा मार्ग का निवडत आहेत?
मानसिक आरोग्याला प्राधान्य
आजची तरुण पिढी कामाच्या ताणतणावापेक्षा स्वतःच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याला अधिक महत्व देते. विषारी कार्यसंस्कृती किंवा सततचा ताण असल्यास ते लगेच दूर जाण्याचा निर्णय घेतात.
करिअरबाबत वेगळा दृष्टीकोन
पूर्वी एका कंपनीत अनेक वर्षे काम करणे यशाचे लक्षण मानले जायचे. मात्र Gen Z सतत नवीन संधी, कौशल्यविकास आणि करिअरमध्ये वेगवान बदल शोधत असते.
कठीण संवाद टाळण्याची प्रवृत्ती
डिजिटल युगात वाढलेल्या या पिढीला ऑनलाईन संवाद अधिक सोयीस्कर वाटतो. त्यामुळे प्रत्यक्ष किंवा औपचारिक राजीनामा देण्यासारख्या अवघड चर्चापासून काही जण दूर राहतात.
पर्यायी करिअरचे वाढते आकर्षण
फ्रीलान्सिंग, कंटेंट क्रिएशन, स्टार्टअप्स, रिमोट वर्क आणि डिजिटल व्यवसाय यांसारखे अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे पारंपरिक नोकरी हीच एकमेव वाट राहिलेली नाही.
कंपन्यांसाठी हा इशारा का आहे?
Ghost Resignation ही केवळ कर्मचाऱ्यांची सवय नाही, तर कार्यसंस्कृतीत होत असलेल्या बदलांचे प्रतिबिंब आहे. कर्मचारी जर अचानक निघून जात असतील, तर त्यांच्या अपेक्षा, संवादातील अडथळे किंवा कामाच्या वातावरणातील समस्या यांचा विचार करणे आवश्यक ठरते.






