FIFA World Cup 2026: फुटबॉल प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. FIFA World Cup 2026 चे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. आता चाहत्यांना त्यांच्या आवडत्या टीमचे सामने कधी आणि कुठे होणार आहेत हे सहजपणे पाहता येणार आहे. चला तर मग, या महास्पर्धेतील संपूर्ण मॅचेसची यादी आणि महत्वाची माहिती जाणून घेऊया.
फुटबॉल चाहत्यांसाठी सर्वात मोठी स्पर्धा FIFA World Cup 2026 जवळ येत आहे. या महास्पर्धेचा काऊंटडाऊन सुरू झाला असून संपूर्ण क्रीडा जगतात उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित केली जाणार आहे. एकूण ४८ संघ जेतेपदासाठी मैदानात उतरतील.
हेही वाचा : Gen Z मध्ये वाढत चाललेला ‘Silent Exit’ ट्रेंड; नेमका काय आहे? जाणून घ्या एका क्लिकवर
नव्या फॉरमॅटमध्ये रंगणार स्पर्धा
या वेळी पहिल्यांदाच ४८ संघाची १२ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ आणि तिसऱ्या क्रमाकांवरील सर्वोत्तम ८ संघ पुढील राऊंड ऑफ ३२ मध्ये प्रवेश करतील. ग्रुप स्टेजमध्ये एकूण ७२ सामने खेळवले जाणार आहेत, ज्यामुळे स्पर्धा अधिक रोमांचक होणार आहे.
उद्घाटन आणि अंतिम सामना
स्पर्धेची सुरुवात 12 जून रोजी मेक्सिको विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्याने होणार आहे. तर अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यू जर्सी येथे खेळवला जाईल.
FIFA World Cup 2026 संपूर्ण वेळापत्रक (हायलाइट्स)
12 जून
मेक्सिको vs दक्षिण आफ्रिका – 12:30 AM, मेक्सिको सिटी
दक्षिण कोरिया vs झेकिया – 7:30 AM, झॅपोपन
13 जून
कॅनडा vs बोस्निया & हर्झगोव्हिना – 12:30 AM, टोरांटो
USA vs पॅराग्वे – 6:30 AM, लॉस एंजेलिस
14 जून
ब्राझील vs मोरोक्को – 3:30 AM, न्यू जर्सी
जर्मनी vs कुराकाओ – 10:30 PM, ह्यूस्टन
15 जून
नेदरलँड्स vs जपान – 1:30 AM, आर्लिंग्टन
स्पेन vs केप व्हर्डे – 9:30 PM, अटलांटा
17 जून
फ्रान्स vs सेनेगल – 12:30 AM, न्यू जर्सी
अर्जेंटिना vs अल्जेरिया – 6:30 AM, कॅन्सस सिटी
पोर्तुगाल vs DR काँगो – 10:30 PM, ह्यूस्टन
18 जून
इंग्लंड vs क्रोएशिया – 1:30 AM, आर्लिंग्टन
मेक्सिको vs दक्षिण कोरिया – 6:30 AM, झॅपोपन
20 जून
USA vs ऑस्ट्रेलिया – 12:30 AM, सिएटल
ब्राझील vs हैती – 6:00 AM, फिलाडेल्फिया
नेदरलँड्स vs स्वीडन – 10:30 PM, ह्यूस्टन
22 जून
अर्जेंटिना vs ऑस्ट्रिया – 10:30 PM, आर्लिंग्टन
25 जून
जर्मनी vs इक्वेडोर – 1:30 AM, न्यू जर्सी
स्पेन vs सौदी अरेबिया – 9:30 PM, अटलांटा
28 जून
इंग्लंड vs पनामा – 2:30 AM, न्यू जर्सी
अर्जेंटिना vs जॉर्डन – 7:30 AM, आर्लिंग्टन






