Breaking News :
  • Home
  • क्रीडा
  • जर्मनीची दमदार एंट्री! कुरासाओवर 7-1 विजयाने विश्वचषकात धमाकेदार सुरुवात; 2014 च्या ब्राझील पराभवाच्या आठवणी ताज्या
Top News

जर्मनीची दमदार एंट्री! कुरासाओवर 7-1 विजयाने विश्वचषकात धमाकेदार सुरुवात; 2014 च्या ब्राझील पराभवाच्या आठवणी ताज्या

FIFA World Cup 2026

FIFA World Cup 2026: जर्मनीने फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेत दमदार सुरुवात करत कुरासाओचा ७-१ अशा मोठ्या फरकाने पराभव केला. या दणदणीत विजयामुळे जर्मनीने केवळ तीन गुणांची कमाई केली नाही, तर २०१४ विश्वचषकात ब्राझीलविरुद्धच्या ऐतिहासिक ७-१ विजयाच्या आठवणीही चाहत्यांच्या मनात पुन्हा ताज्या केल्या आहेत.

फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेत जर्मनीने आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात करत पदार्पण करणाऱ्या कुरासाओ संघाचा ७-१ अशा मोठ्या फरकाने पराभव केला. ई गटातील या सामन्यात जर्मनीने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेतील इतर संघाना इशारा दिला आहे.

हेही वाचा: मनोरंजनविश्वातून धक्कादायक बातमी! प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरी जीवन संपवले; नेमकं काय घडलं?

जर्मनीने आघाडी घेतली

सामन्याच्या सुरुवातीलाच जर्मनीने आघाडी घेतली होती. मात्र कुरासाओने स्पर्धेतील आपला पहिला विश्वचषक गोल नोंदवत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर जर्मनीने पूर्ण वर्चस्व गाजवत सलग गोलांची बरसात केली.

जर्मनीकडून फेलिक्स नमेचा, निको श्लोटरबेक, जमाल मुसियाला, नॅथॅनियल ब्राऊन आणि डेनीझ उंडाव यांनी प्रत्येकी एक गोल केला, तर काई हावर्ट्झने दोन गोल केले. या विजयामुळे जर्मनीने गटात पहिले स्थान पटकावले.

2014 च्या विश्वचषक उपांत्य फेरीची चर्चा

या सामन्यानंतर सोशल मीडियावर 2014 च्या विश्वचषक उपांत्य फेरीची पुन्हा चर्चा रंगली आहे. त्या वेळी जर्मनीने यजमान ब्राझीलचा 7-1 असा ऐतिहासिक पराभव केला होता. कुरासाओविरुद्धही त्याच गोलफरकाने विजय मिळवल्याने फुटबॉल चाहत्यांनी विविध मीम्स आणि प्रतिक्रिया शेअर केल्या.

जर्मनीच्या या कामगिरीमुळे संघाचा आत्मविश्वास उंचावला असून पुढील सामन्यांमध्येही त्यांच्याकडून अशाच प्रभावी प्रदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, पहिल्यांदाच विश्वचषकात सहभागी झालेल्या कुरासाओसाठी हा पराभव जरी मोठा असला तरी स्पर्धेतील पहिला गोल नोंदवणे हा त्यांच्या फुटबॉल इतिहासातील महत्त्वाचा क्षण ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts