Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • मनोरंजनविश्वातून धक्कादायक बातमी! प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरी जीवन संपवले; नेमकं काय घडलं?
ताज्या बातम्या

मनोरंजनविश्वातून धक्कादायक बातमी! प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरी जीवन संपवले; नेमकं काय घडलं?

Sanchita Ugale death

Sanchita Ugale Death News: मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने ओळख निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले यांच्या निधनाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे.

टेलीव्हीजन आणि हिंदी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने ओळख निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संचिता उगले यांच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: शाहू महाराजांच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटलांचे मोठे वक्तव्य; कुणबी नोंदी, आरक्षण आणि शेतकरी प्रश्नांवर स्पष्ट भूमिका

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री संचिता उगले मुंबईतील नालासोपारा परिसरात आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास होत्या. अचोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्या राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवार संध्याकाळी सुमारे साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासात त्यांच्या घरातून कोणतीही सुसाईट नोट सापडलेली नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून विविध शक्यता तपासल्या जात आहेत.

अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले

संचिता उगले यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले होते. हिंदी आणि मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘कुमकुम भाग्य’, ‘वागले की दुनिया’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमधून त्या प्रेक्षकांच्या परिचयाच्या झाल्या होत्या.

तसेच त्यांनी चित्रपट आणि वेब प्रोजेक्ट्समध्येही काम केले होते. अलीकडेच त्या एका मोठ्या चित्रपट प्रोजेक्टचा भाग असल्याचे सांगितले जाते.

त्यांच्या निधनामुळे सहकलाकार, दिग्दर्शक आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून सोशल मीडियावर अनेकांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे. मनोरंजन क्षेत्रातील एक होतकरू आणि प्रतिभावान अभिनेत्री हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

या घटनेमुळे संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त होत असून सर्व स्तरातून दु:ख व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts