Theam Cake Dangerous: सोशल मीडियावर सध्या एका आईचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या मुलासोबत घडलेल्या धक्कादायक अनुभवाबद्दल सांगताना दिसते. वाढदिवसाच्या आनंदात झालेली एक छोटीशी गोष्ट किती मोठी संकट निर्माण करू शकते, याचा हा अनुभव अनेक पालकांसाठी डोळे उघडणारा ठरत आहे.
मुलाचा वाढदिवस खास बनवण्यासाठी कुटूंबाने आकर्षकथीमवर आधारित केक मागवला होता. केकची सजावट पाहून सर्वजण आनंदी होते. मात्र पार्टीदरम्यान लहान मुलाने सजावटीचा एक भाग नकळत गिळल्याचा संशय कुटुंबीयांना आला. सुरुवातीला याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही, पण नंतर सजावटीसाठी वापरलेल्या साहित्यामध्ये धातूचा आधार असल्याचे लक्षात आले.
हेही वाचा: BYD चे मोठे पाऊल! १२०० किमीपर्यंत रेंज देणारे ‘DM- i’ हायब्रीड तंत्रज्ञान भारतात सादर
रुग्णालयात धाव
घटनेची माहिती मिळताच कुटूंबियांनी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तपासणीदरम्यान डॉक्टरांना मुलाच्या पचनसंस्थेमध्ये धातूचे तुकडे असल्याचे आढळून आले. त्यानंतर काही काळ मुलाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले.
४८ तासांची प्रतीक्षा
कुटुंबासाठी पुढील काही तास अत्यंत तणावपूर्ण ठरले. डॉक्टरांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आणि सुदैवाने कोणतीही शस्त्रक्रिया न करता धातूचे तुकडे नैसर्गिकरित्या शरीराबाहेर पडले. यानंतर कुटूंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
पालकांसाठी महत्वाचा संदेश
या अनुभवातून त्या आईने सर्व पालकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. केक, चॉकलेट्स किंवा इतर खाद्यपदार्थांवरील सजावट पूर्णपणे खाण्यायोग्य आहे का, याची खात्री करणे आवश्यक असल्याचे तिने सांगितले. अनेकदा सजावटीसाठी वापरले जाणारे प्लास्टिक, लाकडी किंवा धातूचे साहित्य लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते.
सोशल मीडियावर चर्चेचा विषय
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी केवळ खाद्यपदार्थच नव्हे, तर त्यावरील सजावटीचीही तपासणी करणे तितकेच महत्वाचे असल्याचे अनेकांनी नमूद केले. तसेच, बेकरी आणि केक उत्पादकांनी अशा साहित्याबाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती देण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.






