Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • Top News
  • BYD चे मोठे पाऊल! १२०० किमीपर्यंत रेंज देणारे ‘DM- i’ हायब्रीड तंत्रज्ञान भारतात सादर
Top News

BYD चे मोठे पाऊल! १२०० किमीपर्यंत रेंज देणारे ‘DM- i’ हायब्रीड तंत्रज्ञान भारतात सादर

BYD DM-i Hybrid

BYD DM-i Hybrid: BYD ने भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठे पाऊल टाकत आपले प्रगत ‘DM-i’ हायब्रीड तंत्रज्ञान सादर केले आहे. या तंत्रज्ञानामुळे एका चार्ज आणि फुल टँकवर तब्बल 1200 किलोमीटरपर्यंत रेंज मिळू शकते, ज्यामुळे इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहन क्षेत्रात नवी क्रांती होण्याची शक्यता आहे.

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता BYD कंपनीने एका महत्वपूर्ण घोषणा केली आहे. कंपनीने आपले प्रगत ‘DM-i (Dual Mode – Intelligent)’ प्लग- इन- हायब्रीड तंत्रज्ञान भारतात आणले असून, या तंत्रज्ञानामुळे एका चार्ज आणि फुल टँकवर १२०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापता येण्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा: Gen Z मध्ये वाढत चाललेला ‘Silent Exit’ ट्रेंड; नेमका काय आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

इलेक्ट्रिकवर आधारित हायब्रीड सिस्टम

DM-i तंत्रज्ञानाची खासियत म्हणजे ते ‘इलेक्ट्रिक- फर्स्ट’ पद्धतीवर काम करते. म्हणजेच, शहरातील रोजच्या प्रवासासाठी गाडी प्रामुख्याने इलेक्ट्रिक मोडमध्ये चालते. गरज भासल्यास पेट्रोल इंजिन सहाय्यक भूमिकेत येते, ज्यामुळे मायलेज आणि कार्यक्षमता दोन्ही सुधारते.

लांब प्रवासातही मजबूत बॅकअप

या प्रणालीमध्ये बॅटरी आणि इंजिन यांचा समतोल वापर केला जातो. त्यामुळे लांबच्या प्रवासातही वारंवार चार्जिगची गरज कमी होते. कंपनीच्या मते, योग्य वापरात ही गाडी १२०० किमीपेक्षा अधिक अंतर सहज पार करू शकते.

इंजिन आणि तंत्रज्ञानाची रचना

या सिस्टममध्ये १.५ लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे उच्च कार्यक्षमतेसाठी ओळखले जाते. हे इंजिन BYD च्या आधुनिक Blade Battery आणि इलेक्ट्रिक मोटर्ससोबत समन्वय साधते.

DM- i सिस्टममध्ये तीन प्रमुख ड्रायव्हिंग मोड्स उपलब्ध आहेत

EV मोड: पूर्णपणे इलेक्ट्रिक ड्रायव्हिंग
सीरीज हायब्रीड मोड: इंजिन बॅटरी चार्ज करते, ड्राइव्ह इलेक्ट्रिकवरच

परफॉर्मन्स आणि क्षमता

कंपनीच्या दाव्यानुसार, या तंत्रज्ञानावर आधारित वाहने उत्तम अ‍ॅक्सिलरेशन देतात आणि कमी वेळात उच्च वेग गाठू शकतात. त्याचबरोबर इंधन बचत आणि कमी उत्सर्जन हेही महत्त्वाचे फायदे आहेत.

भारतातील वाढती उपस्थिती

भारतात BYD ने आधीच Seal, Atto 3, Sealion 7 आणि eMax 7 यांसारखी मॉडेल्स सादर केली आहेत. कंपनी आपले नेटवर्क वाढवत असून प्रीमियम EV आणि हायब्रीड बाजारात आपली मजबूत पकड निर्माण करत आहे.

नवीन DM-i तंत्रज्ञानामुळे भारतातील इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांच्या स्पर्धेत मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts