Viral Job Advertisement Sparks Controversy in Mumbai: मुंबईतील एका नोकरीच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. एका खासगी कंपनीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य दिल्याचा दावा केला जात असून, यावरून अनेकांनी आक्षेप नोंदवले आहेत. चालतर जाणून घेऊयात नेमका काय प्रकरण आहे.
सध्या मुंबईतील एका खासगी कंपनीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य दिल्याचा दावा केला जात आहे. एका भरती एजन्सीमार्फत व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर वरिष्ठ पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदासाठी वार्षिक वेतन सुमारे २५ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले होते.
हेही वाचा: आईच्या डोळ्यातील अश्रू अन् आंदोलनाचा निर्धार; अभिजीत दीपके नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या
मात्र, जाहिरातीतील पात्रता निकषांमध्ये स्पष्ट म्हटले नमूद केले होते की गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य देण्यात आल्याचा उल्लेख असल्याचे स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर या भरती प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले.
सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
जाहिरात समोर आल्यानंतर विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. रोजगाराच्या संधी सर्व पात्र उमेदवारांसाठी समान असाव्यात आणि जात, भाषा किंवा समुदायाच्या आधारे कोणताही भेदभाव होता कामा नये, अशी भूमिका अनेकांनी मांडली.
चौकशीची मागणी
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जाहिरात नेमकी कोणी प्रसिद्ध केली, तसेच त्यामागील धोरण काय होते, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी काही संघटनांकडून करण्यात आली आहे. संबंधितांवर आवश्यक ती कारवाई व्हावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.
राजकीय प्रतिक्रिया
या विषयावर काही राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली असून, मुंबईसारख्या बहुसांस्कृतिक शहरात रोजगाराच्या संधी देताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये, असे मत व्यक्त केले आहे.
रोजगार क्षेत्रातील समान संधींचा मुद्दा पुन्हा चर्चेत
या घटनेमुळे रोजगार क्षेत्रातील समान संधी, भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि भाषिक किंवा सामाजिक आधारावरील भेदभाव या मुद्द्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर अनेक जणांनी गुणवत्तेच्या आधारेच उमेदवारांची निवड व्हावी, अशी भूमिका घेतली आहे.












