LIC HFL Junior Assistant Recruitment 2026: तुम्हीही बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी महत्वाची आहे. कारण LIC HFL मध्ये ज्युनियर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या राज्यात किती जागा आहेत. यासाठी कोण अर्ज करू शकतात.
ज्यांना फायनान्स आणि बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठित करिअर घडवायचे आहे. त्यांच्यासाठी एक उत्कृष्ट संधी उपलब्ध झाली आहे. आघाडीच्या हाऊसिंग फायनान्स कंपन्यांपैकी एक असलेल्या LIC Housing Finance Limited (LIC HFL) ने 2026 साठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे.
या भरतीअंतर्गत ज्युनियर असिस्टंट पदासाठी सुमारे 180 जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३० एप्रिल २०२६ आहे. आणि ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असून जून मध्ये होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: नशिबाचा टर्निंग पॉइंट! अमावस्येला बदलणार ‘या’ 2 राशींचं भाग्य; वाचा आजचं राशीभविष्य
या भरतीमध्ये ज्युनियर असिस्टंट हे एकमेव पद आहे. देशभरातील विविध शाखांमध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे निवड झाल्यानंतर उमेदवाराला भारतातील कोणत्या ठिकाणी काम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेतून किमान ५५ % गुणांसह पदवी प्राप्त केलेली असावी. ही पदवी भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून असणे आवश्यक आहे. तसेच, कॉम्प्युटर सिस्टीमचे मूलभूत ज्ञान आणि त्यावर काम करण्याची क्षमता अनिवार्य आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे correspondence, distance किंवा part-time पद्धतीने पूर्ण केलेले अभ्यासक्रम या भरतीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
वयोमर्यादा
०१ एप्रिल २०२६ रोजी, रोजी उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षे असावे. शासकीय नियमांनुसार, राखीव प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत मिळू शकते.
अर्ज प्रक्रिया आणि शुल्क
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने पार पाडली जाईल. इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा लागेल. अर्जासाठी ९४४ शुल्क आकारले जाईल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड प्रामुख्याने ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून केली जाईल. जे उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण होतील, त्यांना पुढील प्रक्रियेसाठी बोलावले जाईल.












