ITBP Recruitment 2026: पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ITBP मध्ये इंजिनिअर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसंदर्भातील वेतनमान आणि वयोमर्यादा जाणून घेऊया.
जर तुमचं पदवी शिक्षण पूर्ण झालं असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे. कारण ITBP कडून एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. भारत-तिबेट सीमा पोलीस दलात असिस्टंट कमांडंट इंजिनिअर पदांसाठी अधिकृत भरती जाहीर करण्यात आली असून, या भरतीमुळे इंजिनिअरिंग क्षेत्रातील तरुणांना देशसेवेबरोबरच आकर्षक करिअर घडवण्याची संधी मिळणार आहे.
या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 21 एप्रिलपासून सुरू झाली असून २० मे ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. चला तर जाणून घेऊया या भरतीतील वेतनमान, पात्रता आणि वयोमर्यादा याबाबत सविस्तर माहिती.
हेही वाचा: अशोक खरातची SIT चौकशीदरम्यान तब्येत बिघडली; नेमकं काय घडलं पाहा?
पगार
निवड झालेल्या उमेदवारांना रु. ५६,१०० ते रु. १,७७,५०० पर्यंत मासिक पगार दिला जाईल.
आवश्यक पात्रता
उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
कमल वय: ३० वर्षे
SC/ST: ५ वर्षांची जागा
OBC: ३ वर्षांची जागा
अर्ज शुल्क
सर्वसाधारण / OBC / EWS: ४००
SC / ST / महिला उमेदवार: कोणतेही शुल्क नाही
निवड प्रक्रिया
परीक्षा दोन पेपरमध्ये घेतली जाईल
पेपर १
सामान्य ज्ञान, तर्कशास्त्र, गणित आणि इंग्रजी – १०० प्रश्न
पेपर २
संबंधित अभियांत्रिकी विषयांवर आधारित प्रश्न – १०० गुण
परीक्षेचा कालावधी: २ तास
उत्तीर्ण होण्यासाठी गुण
सर्वसाधारण/OBC/EWS: ५०%
SC/ST: ४५%
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवार ITBP च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम वेबसाइटवर नोंदणी (Registration) करावे.
त्यानंतर लॉगिन करून आवश्यक वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा.
भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवणे आवश्यक आहे.












