• Home
  • शैक्षणिक बातम्या
  • रोमॅन्सच्या नावाखाली घात; प्रियकराला खुर्चीवर बसवलं, डोळे झाकले अन्.. प्रेयसीने केलं भयंकर कृत्य
Top News

रोमॅन्सच्या नावाखाली घात; प्रियकराला खुर्चीवर बसवलं, डोळे झाकले अन्.. प्रेयसीने केलं भयंकर कृत्य

crime 3

Crime News | दक्षिण बंगळुरुमध्ये (South Bangalore) एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीने प्रियकराला घरी बोलवत त्याच्यासोबत भयंतर कृत्य केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं बंगळुरूमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रियकर आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा राग मनात धरून प्रेयसीने त्याची हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेनं पोलीस देखील हादरले आहेत.

हेही वाचा – “भारत कधीही झुकणार नाही…”; पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचा दहशतवादाविरोधात घणाघात

प्रेयसीने प्रियकराची केली निघृण हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेरणा नावाची एक तरूणी टेलिकॉमच्या दुकानात काम करत होती. तिथे किरण नावाचा एक तरूण देखील तिच्यासोबत काम करत होता. प्रेरणा आणि किरण हे दोघे एकाच ठिकाणी काम करत असताना त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. गेल्या वर्षभरापासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि दोघांमध्ये सर्वकाही ठीक चाललं होतं. पण मागील काही दिवसांपासून किरण आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं प्रेरणाला वाटू लागलं होतं. त्यामुळे प्रेरणाच्या मनात किरणविषयी राग निर्माण झाला होता. तर या रागाच्या भरात प्रेरणाने धक्कादायक कृत्य केलं आहे.

नेमकं घडलं काय?

प्रेरणाने किरणला घरी कोणी नाहीये असं सांगत तिच्या घरी बोलावलं. दोघांना वेळ घालवता येईल म्हणून किरण देखील तिच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर आपण आज काहीतरी वेगळं करू असं प्रेरणा किरणला म्हणाली. त्यानंतर तिने किरणला खुर्चीवर बसवलं आणि त्याचे डोळे रूमालाने बांधले. तसेच त्याचे हात-पाय देखील बांधले. हे सर्व करताना किरणने तिला हे काय करत आहेस? असं विचारलं. त्यावर मी तुला परदेशात जसं प्रपोज करतात तसं प्रपोज करून रोमान्स करत आहे, असं प्रेरणा उत्तर देते. मग किरणनेही तिच्यावर विश्वास ठेवला. मात्र, प्रेरणाचा खरा कट काय होता याबाबत त्याला कसलीही कल्पना नव्हती.

प्रेरणाने किरणचे हात-पाय बांधल्यानंतर तिने कसलाही विचार न करता थेट ती खुर्ची पेटवून दिली. प्रेरणा एवढ्यावरच थांबली नाही तर तिने आपला प्रियकर कसा मरत आहे याचे व्हिडीओ रेकॉर्डींग देखील तिने केले. तिने केलेल्या या कृत्याचा तिला कसलाही पश्चाताप झालेला नाही. तिने हे सर्व शांत डोक्याने केल्याचं म्हटलं जात आहे. तर पोलिसांनी प्रेरणावर गुन्हा दाखल केला असून तिला अटक केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts