8th Pay Commission Consultant Recruitment 2026: आठव्या वेतन आयोगात (8th Central Pay Commission) कन्सल्टंट पदांसाठी भरती सुरू झाली आहे. सरकारने आयोगाचे काम पुढे नेण्यासाठी ही भरती जाहीर केली आहे.
केंद्र सरकारने ८ व्या वेतन आयोगाच्या कामासाठी कन्सल्टंट पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती कायमस्वरूपी नसून कराराधारित (contract) असेल, म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना ठराविक कालावधीसाठी नियुक्त केले जाणार आहे.
या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ठेवण्यात आली आहे. उमेदवारांची निवड हि त्याच्या शैक्षणिक पात्रता आणि कामाच्या अनुभवाच्या आधारे केली जाणार आहे. या पदांवर निवड झाल्यास उमेदवारांना ९० हजार ते १ लाख ८० हजार मासिक मानधन मिळू शकते.
हेही वाचा : हेल्दी मॉर्निंग रूटीन! रिकाम्या पोटी वेलचीचं पाणी प्या आणि मिळवा जबरदस्त आरोग्यदायी फायदे
या भरतीद्वारे नियुक्त होणारे तज्ज्ञ सरकारला वेतन रचना, भत्ते आणि पेन्शन प्रणाली सुधारण्यासाठी मार्गदर्शन करतील. फायनान्स, कायदा, मानव संसाधन आणि संबंधित क्षेत्रांतील अनुभवी व्यक्तींना प्राधान्य दिले जाणार आहे. या भरतीमध्ये एकूण सुमारे २० जागा उपलब्ध आहेत.
पदांबाबत अधिक माहिती
सिनियर कन्सल्टंट
कन्सल्टंट
यंग प्रोफेशनल
शैक्षणिक पात्रता
फायनान्स
HR
इंडस्ट्रियल रिलेशन्स
संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा MBA आवश्यक आहे.
तसेच कायद्याची पदवी (LL.B) असलेले उमेदवार देखील पात्र आहेत.
अनुभवाची अट पदानुसार साधारणतः 4 ते 10 वर्षे आहे.
वयोमर्यादा
सीनियर कन्सल्टंट: 45 वर्षांपर्यंत
कन्सल्टंट: 40 वर्षांपर्यंत
यंग प्रोफेशनल: 32 वर्षांपर्यंत
मानधन
सीनियर कन्सल्टंट: जास्तीत जास्त 1,80,000 प्रति महिना
कन्सल्टंट: जास्तीत जास्त 1,20,000 प्रति महिना
यंग प्रोफेशनल: जास्तीत जास्त 90,000 प्रति महिना
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://8cpc.gov.in/ वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आणि अनुभवाची माहिती अपलोड करणे आवश्यक आहे. निवड झाल्यानंतर उमेदवारांना वेतन धोरण तयार करणे, पेन्शन व्यवस्थेचे विश्लेषण, डेटा स्टडी आणि अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली जाईल.











