Modi Cabinet Reshuffle: केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चला तर जाणून घेऊयात याबाबत अधिक सविस्तर माहिती आजच्या खास लेखात
केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे बदल रविवार किंवा सोमवारपर्यंत जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली असून, या भेटीत संभाव्य फेरबदलांबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही घोषणा अद्याप करण्यात आली नाही.
हेही वाचा: ठाकरे गटात पुन्हा खळबळ! 14 आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा; ‘ऑपरेशन टायगर 3’ची शक्यता
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची जबाबदारी बदलून त्यांना मनुष्यबळ विकास (शिक्षण) विभाग दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. तसेच धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप पुरी यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. विशेषतः नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांच्यावर राजकीय दबाव वाढल्याचे बोलले जात आहे. (Modi Cabinet Reshuffle)
Modi Cabinet :
नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता
दुसरीकडे, एनडीएच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून एनडीएला मिळालेल्या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच अलीकडील राजकीय घोडामोडींमुळे काही पक्षांतर केलेल्या नेत्यांनाही केंद्रात स्थान दिले जाऊ शकते, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडील आरोग्य राज्यमंत्रिपद काढून घेतले जाऊ शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांना फक्त आयुष मंत्रालयाची जबाबदारी कायम ठेवली जाऊ शकते. यामुळे मंत्रिमंडळात नवीन समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (LS Marathi News Channel)
काही इतर राज्यमंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो
याशिवाय काही इतर राज्यमंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, तर काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. पंजाबमधील राजकीय समीकरणे, तसेच इतर प्रादेशिक पक्षांतील घडामोडी यांचाही या फेरबदलांवर परिणाम होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
सध्या तरी या सर्व चर्चा आणि अंदाजांवर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष घोषणा होईपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळातील बदलांबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता कायम राहणार आहे. (Latest Political News)











