Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • यवतमाळ सभेत संजय राऊतांचा संजय देशमुखांवर हल्लाबोल; कडक शब्दांत टोला, म्हणाले गद्दार…
ताज्या बातम्या

यवतमाळ सभेत संजय राऊतांचा संजय देशमुखांवर हल्लाबोल; कडक शब्दांत टोला, म्हणाले गद्दार…

Sanjay Raut Yavatmal
Sanjay Raut Yavatmal: यवतमाळ येथे झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या सभेत खासदार संजय राऊत यांनी फुटीर खासदारांवर जोरदार टीका करत राजकीय वातावरण तापवले.

यवतमाळ येथे झालेल्या शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या सभेत खासदार संजय राऊत यांनी पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली फुटीर खासदार संजय देशमुखच्या मतदारसंघात सुरू असलेल्या मेळाव्याच्या मालिकेचा भाग म्हणून ही सभा आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा: थिएटरनंतर OTTवर ‘राजा शिवाजी’चा जलवा; कुठे पाहाल हा ब्लॉकबस्टर चित्रपट?

संजय देशमुखांवर राऊतांची टीका

सभेत बोलताना संजय राऊत यांनी पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर थेट निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, शिवसेनेने अनेकांना मोठं केलं, पण काहींनी वैयक्तिक फायद्यासाठी पक्ष सोडला. “ज्यांना शिवसेनेने ओळख दिली, त्यांनीच पक्षाशी गद्दारी केली,” असा आरोप त्यांनी केला.

राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे आणि निष्ठावंत शिवसैनिकांमुळेच शिवसेना आजही टिकून आहे.

विकास निधी आणि राजकारणावर टिप्पणी

आपल्या भाषणात त्यांनी विकास निधी आणि राजकीय पक्षांमधील बदलांवरही भाष्य केले. काही नेते विकासाच्या नावाखाली दुसऱ्या पक्षात गेले, पण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत, असा दावा त्यांनी केला.

त्यांनी केंद्र सरकारवरही अप्रत्यक्ष टीका करत सांगितले की, देशातील विकासाच्या मुद्द्यांवर अनेक प्रश्न उपस्थित आहेत आणि मोठ्या घोषणा असूनही सामान्य नागरिकांच्या समस्या कायम आहेत.

“शिवसेना कायम मजबूत राहील”

संजय राऊत यांनी पुढे म्हटले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक मजबूत होत आहे. नागपूरमधील अलीकडील सभेला मिळालेल्या प्रतिसादाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, पक्षात अजूनही मोठी ताकद आणि जनाधार कायम आहे.

राजकीय वातावरण तापले

या सभेमुळे यवतमाळमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. फुटीर खासदारांवर झालेल्या टीकेनंतर पुढील काळात राजकीय प्रतिक्रिया तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts