Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे हे नाव चर्चेत आले तर समजायचे की कुणावर तरी कारवाई झालीच आहे…तुकाराम मुंढे हे FDA चे आयुक्त झाल्यापासून त्यांनी महाराष्ट्रात कारवाईचा धडाकाच सुरु केला आहे…त्यांनी राज्यातून भेसळयुक्त पनीर आणि दूध गायबच केलं आहे…तसंच त्यांनी राज्यभरातील गुटखा विक्रीवर देखील धडक कारवाईच सुरु केली आहे…गुटखा विक्रेत्यावर त्यांनी थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत..त्यामुळे त्यांचे धाबेच दणाणले आहेत…यानंतर आता तुकाराम मुंढेंनी आपला मोर्चा थेट हॉटेल चालकांकडे वळवला आहे…त्यांनी नियम मोडणाऱ्या मोठं मोठ्या हॉटेलवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे…संभाजीनगरमधील एक प्रसिद्ध हॉटेल बंद केलं आहे…त्यानंतर आता नाशिकमध्ये 4 हॉटेल बंद करण्यात आली आहे…तर 9 हॉटेलचे परवाने रद्द करण्यात आले आहे? या हॉटेलचे परवाने रद्द का करण्यात आले आहेत? तुकाराम मुंढे हॉटलेवर कारवाई का करत आहेत? पाहूयात या व्हिडिओतून….
राज्यातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू केली…याच मोहिमेतून मुंबई, पुणे, जळगाव, संभाजीनगरमध्ये धडक कारवाई करण्यात आलीये….आता तुकाराम मुंढेंनी आपला मोर्चा थेट नाशिकडे वळवला आहे…नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी भेसळयुक्त मिठाई, पेढे आणि दुग्धजन्य पदार्थांवर कठोर कारवाई करण्यात आली होती..आता नाशिक आणि परिसरातील तब्बल 20 मोठ्या आणि नामांकित हॉटेल्सवर अचानक छापे टाकण्यात आलेय… या तपासणीत स्वयंपाकघरातील भीषण अस्वच्छता, निकृष्ट दर्जाची शीतकरण व्यवस्था, उघड्यावरील शिळे अन्न, कामगारांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा, वैद्यकीय तपासणीचा अभाव आणि स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या निकृष्ट दर्जासारखे संतापजनक प्रकार उघडकीस आले.. अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याबद्दल हॉटेल ग्रीन वॉल, हॉटेल राधिका , हॉटेल क्राउन पॅलेस, लक्ष्मी हॉटेल, हॉटेल त्रिमूर्ती , हॉटेल भानू, जाधव रेस्टॉरंट, हॉटेल जय आणि धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील ‘गजानन कॅन्टीन’ अशा एकूण 9 नामांकित आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहेत.
हेही वाचा : नवऱ्याला मारलं बाथरुमखाली पुरलं बाई 45 दिवसांनी सापडली नेटकरी म्हणतात पुरूष जात नष्ट होईल..!
Tukaram Mundhe : या कारवाईतील सर्वात मोठा दणका विनापरवाना हॉटेल चालवणाऱ्यांना बसला आहे.. तपासणीदरम्यान नाशिक विभागातील 4 खाद्य आस्थापनांकडे अन्न व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असणारा कोणताही वैध FSSAI परवाना, नोंदणीच आढळली नाही… बेकायदेशीरपणे आणि ग्राहकांच्या जिवाला थेट धोका निर्माण करून व्यवसाय करत असल्यामुळे या चारही विनापरवाना हॉटेल्सना प्रशासनाने तात्काळ कुलूप ठोकण्याचे आणि व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचे कडक लेखी निर्देश दिले आहेत… आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता होईपर्यंत आणि अधिकृत परवाना मिळेपर्यंत या हॉटेल्सना कुलूप उघडता येणार नाही, अशी कडक भूमिका आयुक्त मुंढे यांनी घेतली आहे… हॉटेल मालकांचे राजकीय वजन किंवा आर्थिक ताकद कितीही असली, तरी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची खैर नाही, हाच स्पष्ट इशारा या थेट टाळेबंदीतून देण्यात आला आहे..
नाशकात मुंढेंचा 13 हॉटेल्सना दणका :
यापूर्वी देखील तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली पुणे-मुंबईत नामांकित हॉटेलवर कारवाई केली आहे… पुणे विभागात 70 हून अधिक हॉटेल्सची अचानक तपासणी करून सिंहगड रोडवरील ‘हॉटेल ग्रँड पुरंदर’ , ‘क्राऊन बेकर्स’, बावधन येथील ‘नॅशनल 360’, वाघोलीचे ‘बरकत बिर्याणी हाऊस’ , ‘रॉयल बिर्याणी हाऊस’ आणि आंबेगाव येथील ‘मे. ॲग्रोटीस केटरिंग प्रा. लि.’ या प्रसिद्ध हॉटेल्ससह 7 आस्थापनांचे परवाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत… दुसरीकडे, मुंबईतही नरिमन पॉईंट येथील ‘NCPA’ मधील आदित्य बिर्ला समूहाचे हाय-प्रोफाइल रेस्टॉरंट ‘फ्लिंट अँड वारसा’ येथे मुदतबाह्य अन्नपदार्थ आणि चुकीचे लेबलिंग आढळल्याने त्यावर थेट टाळे ठोकण्यात आले आहे… वांद्रे ,अंधेरी, सांताक्रूझ, भांडुप, आणि बोरीवलीतील 6 बड्या आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.. स्वयंपाकघरात उंदीर-झुरळांचा सुळसुळाट, अस्वच्छता आणि खराब शीतकरण व्यवस्था ही या कारवाईची मुख्य कारणे आहेत…
हॉटेल्सवरील या सर्जिकल स्ट्राईकसोबतच, राज्याच्या पुढच्या पिढीला वाचवण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांच्या 500 मीटर परिसरात मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरणारे ‘स्टिंग’ आणि तत्सम कॅफिनयुक्त एनर्जी ड्रिंक्स विकण्यावर पूर्ण कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे… विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी या पेयांच्या आहारी जाणाऱ्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला होता… त्यावर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शाळाबाहेर या ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालण्याची ऐतिहासिक घोषणा केली. या ड्रिंक्समधील अति-कॅफिन आणि साखरेच्या प्रचंड प्रमाणामुळे शाळकरी मुलांमध्ये चिडचिड, आक्रमकता, ‘शुगर क्रॅश’ आणि लहान वयातच मधुमेह व लठ्ठपणा वाढत असल्याचे वैद्यकीय तपासणीत सिद्ध झाले आहे. उत्पादक कंपन्यांनी स्वतः बाटलीवर लहान मुलांसाठी हे पेय अयोग्य असल्याची चेतावणी छापलेली असतानाही होणारी ही विक्री रोखण्यासाठी नियम मोडणाऱ्या दुकानांचे परवाने थेट रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत…
Tukaram Mundhe :
चकचकीत हॉटेल्सच्या पडद्यामागे सुरू असलेली स्वयंपाकघरातील भीषण अस्वच्छता, उंदीर-झुरळांचा सुळसुळाट, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा वापर, दूषित पाण्याचा पुरवठा आणि कामगारांच्या वैद्यकीय तपासणीचा अभाव यांमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी सुरु असलेला जीवघेणा खेळ, हाच या कारवाईमागचा मुख्य उद्देश आहे, असं म्हटलं जात आहे…तुकाराम मुंढे करत असलेली कारवाई योग्य आहे का?










