Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • लोणावळ्यात कलम 163 लागू; मग पर्यटकांनी नेमकं काय करायचं? फिरायला जाण्यापूर्वी जाणून घ्या नवे नियम
Top News

लोणावळ्यात कलम 163 लागू; मग पर्यटकांनी नेमकं काय करायचं? फिरायला जाण्यापूर्वी जाणून घ्या नवे नियम

Lonavala Tourism News

Lonavala Tourism News: तुमचाही पावसाळ्यात लोणावळा फिरण्याचा प्लॅन करत असाल तर थांबा आधी ही माहिती जाणून घ्या.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले लोणावळा हे देशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनले असून, येथील कोसळणारे धबधबे आणि धुक्याची चादर पर्यटकांना भुरळ पाडत आहे. पावसाळा सुरू होताच भुशी डॅम, टायगर पॉईंट आणि राजमाची परिसरातील हिरवेगार डोंगर पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो निसर्गप्रेमींची पावले लोणावळ्याकडे वळू लागली आहेत.

आता सध्या लोणावळ्यात पर्यटकांची (Lonavala Tourism News) मोठी गर्दी होत असतानाच मुसळधार पावसामुळे पुणे जिल्हा प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत कलम 163 लागू केले आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, लोणावळ्यात पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे का? तसेच कलम 163 म्हणजे नेमके काय? जिल्हाधिकाऱ्यांनी कोणते निर्बंध लागू केले आहेत आणि पर्यटकांना कोणत्या नियमांचे पालन करावे लागणार आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा आणि मावळ परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. दरडी कोसळण्याच्या घटना, धबधब्यांमध्ये वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि मोठ्या प्रमाणावरील पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) 2023 अंतर्गत कलम 163 लागू केले आहे. (Lonavala Tourism News)

हेही वाचा: महाराष्ट्रात पावसाचा प्रकोप; नाशिकला रेड, मुंबईत ऑरेंज अलर्ट; प्रशासन हाय अलर्टवर, जाणून घ्या तुमच्या शहराची स्थिती काय?

लोणावळ्यात पर्यटन पूर्णपणे बंद आहे का? (Lonavala Tourism News)

त्यामुळे अनेक पर्यटकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे. मग लोणावळ्यात पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे का? तर नाही. लोणावळ्यात पर्यटनावर संपूर्ण बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काही महत्वच्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे आदेश ६ जुलैपासून ३१ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.

यामुळे लोणावळ्यात येण्यास बंदी नसली तरी धोकादायक पर्यटनस्थळांवर जाण्यास आणि जीव धोक्यात घालणाऱ्या कृत्यांवर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. आता जाणून घेऊयात कलम १६३ म्हणजे काय?

कलम १६३ म्हणजे काय?

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ मधील कलम १६३ अंतर्गत जिल्हाधिकारी सार्वजनिक सुरक्षा आणि कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करू शकतात. कोणत्याही आपत्ती, अपघात किंवा जीवितहानीची शक्यता असल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे आदेश लागू केले जातात.

कोणत्या ठिकाणी विशेष निर्बंध?

सध्या लोणावळ्यातील (Lonavala Tourist Visit) अनेक लोकप्रिय पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होत आहे. त्यामध्ये भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, पवना धरण, कार्ला येथील एकवीरा देवी मंदिर, लोहगड, विसापूर, तिकोणा, तुंग किल्ला या परिसरात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याचा आणि पाण्याचा वेग वाढण्याचा धोका असल्याने प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.

पर्यटकांना काय करता येणार नाही?

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार खालील गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

धबधबे, ओढे, नद्या आणि धरणांच्या पाण्यात उतरण्यास मनाई.
धोकादायक कडे, दरी किंवा नैसर्गिक धबधब्यांच्या उगमस्थानी जाण्यास बंदी.
जीव धोक्यात घालून सेल्फी, व्हिडिओग्राफी किंवा सोशल मीडियासाठी रील्स तयार करण्यास मनाई.
पर्यटनस्थळी मद्यपान करण्यास बंदी.
मोठ्या आवाजात डीजे किंवा संगीत वाजवण्यास मनाई.
कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवर कारवाई.
महिलांची छेडछाड, हुल्लडबाजी किंवा बेजबाबदार वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही धरण आणि नदीकाठच्या भागात चारचाकी व मोठ्या वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध.
रेल्वे वाहतुकीवरही परिणाम

मुसळधार पावसामुळे लोणावळा–कर्जत घाट विभागातील मंकी हिल आणि खंडाळा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर दरड कोसळली आहे. दगड आणि माती रुळांवर आल्यामुळे रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. सततचा पाऊस आणि धुक्यामुळे कामात अडथळे येत असले तरी मार्ग लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लोणावळ्याला जाण्यापूर्वी काय लक्षात ठेवाल? (Lonavala Tourism News)

लोणावळ्याला जाण्यास बंदी नसली तरी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. हवामानाचा अंदाज तपासूनच प्रवास करा. धोकादायक ठिकाणी जाणे टाळा, पाण्यात उतरण्याचा मोह आवरा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts