Navi Mumbai Taloja Accident: नवी मुंबईतील तळोजा परिसरात मंगळवारी भीषण अपघाताची घटना (Navi Mumbai Taloja Accident) घडली. सेक्टर 10 परिसरात भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाने रस्त्यावरील अनेकांना धडक दिली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
हेही वाचा: फडणवीसांची दिल्ली वारी; अमित शाहांसोबत बैठक, मंत्रिमंडळ विस्तारावर होणार मोठा निर्णय?
प्राथमिक माहितीनुसार, भरधाव कारने सुमारे 8 ते 10 जणांना धडक दिली. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली आणि पोलिसांना माहिती दिली.
या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. (Navi Mumbai Taloja Accident)
दरम्यान, अपघातानंतर कारचालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला असून चालकाचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास सुरू असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.








