• Home
  • Top News
  • अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकला; डोनाल्ड ट्रम्प यांचे नवे लष्करी आदेश, मध्यपूर्वेत तणाव शिगेला
देश

अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकला; डोनाल्ड ट्रम्प यांचे नवे लष्करी आदेश, मध्यपूर्वेत तणाव शिगेला

US Iran conflict
US Iran conflict: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने महत्त्वाचे लष्करी निर्णय घेतल्याची चर्चा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशांनंतर प्रादेशिक सुरक्षा आणि जागतिक स्थैर्याबाबत चिंता अधिक वाढली आहे.

अमेरिका (America) आणि इराण ( Iran) यांच्यात सुरू असलेला लष्करी संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात असून, युद्ध थांबण्याऐवजी आणखी चिघळताना दिसत आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांड दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात व्यापक हवाई कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवासांपासून इराणमधील विविध ठिकाणांवर सातत्याने हवाई हल्ले होत आहेत. विशेषतः होर्मुज खाडी परिसरात कारवायाल वाढवण्यात आल्या असून, रेल्वे पूल, रेल्वे स्थानके आणि महत्ताचे रस्तेही लक्ष्य करण्यात येत आहेत. अमेरिकेने स्पष्ट केले की, कमांडर-इन-चीफ यांच्या निर्देशानुसार ही नवी लष्करी मोहीम सुरू करण्यात आली असून, होर्मुज खाडीची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे.

हेही वाचा: जंतर-मंतरवरून हटवण्याची भीती; विद्यार्थी रात्रभर जागे, अभिजित दिपकेंच्या अन्नत्याग उपोषणाचा दुसरा दिवस !

US Iran conflict : अमेरिकेचे म्हणणे आहे की, इराणची लष्करी क्षमता कमकुवत करणे हे या कारवाईचे आणखी एक महत्वाचे लक्ष्य आहे. दरम्यान, जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावर इराणकडून मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने यापेक्षाही कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. या हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला असून, त्यानंतर अमेरिकेने अधिक आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

एक अमेरिकन सैनिक बेपत्ता

याशिवाय, एक अमेरिकन सैनिक बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. तसेच चार सैनिक गंभीर जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेत संतापाची लाट उसळली आहे. मृत सैनिकांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून, सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबीयांना अधिकृत माहिती दिल्यानंतरच ती सार्वजनिक केली जाणार असल्याचे अमेरिकन लष्कराने सांगितले आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

या घटनेवर प्रतिक्रिया देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मृत सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. “देशाची सेवा करताना त्यांनी सर्वोच्च बलिदान दिले असून ही अत्यंत दु:खद घटना आहे,” असे ट्रम्प म्हणाले. त्यांनी पुढे इराणविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले. दुसरीकडे, इराणही अमेरिकेच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर देत आहे. या वाढत्या संघर्षामुळे संपूर्ण आखाती प्रदेशात तणाव आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts