ताज्या बातम्या

Gen Z तर सुरुवात होती, खरी भीती Gen Alpha ची असणार! काय आहे Gen Alpha जाणून घ्या…

Gen Alpha

Gen Alpha : जेन झी पोरांना आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी ३१ दिवसांपेक्षा जास्त दिवस लढाव लागलं, पण GEN अल्फा ने अवघ्या ५ तासांमध्ये प्रशासनाला आपल्या पायावर झुकवलय…. ही पोरं म्हणजे साधीसुधी पोरं नाहीत, हे डायरेक्ट हायव्होल्टेज करंट आहेत. जेन झी ने तर नुसता धुरळा उडवायला सुरुवात केली होती, पण ही जी २०१० नंतर जन्माला आलेली जेन अल्फा आहे ना, हिने अख्ख्या जगाची झोप उडवायला सुरुवात केली आहे. काय आहे हि GEN अल्फा ? कशी सुरुवात केलीये या पोरांनी ? पाहणार आहोत या VIDEO मधून जेन झी फक्त सुरुवात आहे, खरी भीती तर JEN अल्फाची असणार….

Gen Alpha म्हणजे कोण? नव्या पिढीची डिजिटल ताकद समजून घ्या

१९९७ ते २०१२ च्या दरम्यान जन्माला आलेली पोरं. जेन झी म्हणून ओळखली जातात, ही ती पोरं आहेत, ज्यांनी मोबाईलचा आणि इंटरनेटचा जन्म बघितला. त्याआधीच्या काळात कसं असायचं, बापाने एकदा डोळे वटारले की घरातली पोरं गपगुमान कोपऱ्यात जाऊन बसायची. शिक्षकाने शाळेत छडी काढली की पोरांची बोबडी वळायची. पण या जेन झीच्या पोरांनी तो सगळा जुना धाक धुडकावून लावला. त्यांनी घरात आणि शाळेत मास्तरांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. ही पोरं नोकरीला लागली तर कंपनीच्या मालकाला घाबरत नाहीत. पगार कमी असला किंवा मालकाने जरा जास्त आवाज चढवला की ही पोरं राजीनामा खिशातून काढून तोंडावर मारतात. आपण ज्याला ॲटिट्यूड म्हणतो ना, तो या पोरांच्या रक्तामध्ये भिनलाय. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सॲप या सगळ्यावर या पोरांनी ताबा मिळवला… पोरांच्या हातात मोबाईल आला, पोरं रील्स बनवायला लागली, पोरं ऑनलाईन पैसे कमवायला लागली, हीच काय ती क्रांती, आणि दिल्लीच्या जंतरमंतरवर आपल्या हक्कांसाठी GEN झी ने जोरदार आंदोलने केली, आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच…जेन झी ने जे काही केलं, ती तर नुसती झांकी होती, खरा पिक्चर दाखवायला तर आता जेन अल्फा ( Gen Alpha ) मैदानात उतरली आहे… .

Gen Alpha : जेन अल्फा म्हणजे, २०१० नंतर जन्माला आलेली ही पोरं. ही अल्फा पोरं जन्माला आल्या आल्या त्यांच्या हातात डायरेक्ट आयपॅड आणि टचस्क्रीन मोबाईल आलेला असतो. ही पोरं बोलायला शिकण्याच्या आधी मोबाईलचा लॉक कसा उघडायचा आणि यूट्यूबवर आपली आवडती कार्टूनची लिंक कशी शोधायची, हे शिकलीत. ज्या वयात पोरं विटीदांडू खेळत होते, गोट्या खेळत होते, गुडघ्याला जखमा करून घरी आईचा मार खात होतो, त्या वयात ही अल्फा पोरं मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्या बोटांनी अख्खं जग फिरवत आहेत.

हेही वाचा : दारू, ड्रग्स आणि…’; Gen Z बद्दल कंगना रनौतच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सोशल मीडियावर खळबळ

उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने प्रशासनाला 5 तासांत झुकवलं

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील किशनपूर येथील सर्वोदय इंटर कॉलेजमधील इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या असुविधेच्या विरोधात एक आंदोलन केलं… शाळेतील अत्यंत दयनीय अवस्था आणि प्रशासनाचा मनमानी कारभार याविरुद्ध मुलांचा संताप अनावर झाला होता. शाळेत पिण्याच्या स्वच्छ पाण्याची आणि विजेची मोठी टंचाई होती. वर्गांमधील पंखे बंद होते, बसण्यासाठी बेंच तुटलेले होते आणि स्वच्छतागृहे अत्यंत घाणेरडी होती. प्रवेश प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे पैशांची वसुली केली जात होती. शाळेचे प्राचार्य विद्यार्थ्यांशी सातत्याने उद्धट आणि अभद्र वर्तन करत असल्याचा आरोप मुलांनी केला.

आणि या सगळ्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेच्या गेट ला कुलूप ठोकलं, हातामध्ये पोस्टर घेऊन घोषणाबाजी सुरु केली, हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आणि मागण्यांचे स्लोगन घेऊन विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं… मुलांच्या आंदोलनामुळे केवळ ४ ते ५ तासांच्या आत प्रशासनाला गुडघे टेकवावे लागले. सोशल मीडियावर आंदोलनाचे व्हिडिओ वेगाने व्हायरल झाल्यानंतर जिल्हा विद्यालय निरीक्षक आणि शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि पुढील २४ तासांत शाळा सुधारण्याचे लेखी आश्वासन दिले. लेखी पत्र मिळाल्यानंतरच मुलांनी आपले आंदोलन मागे घेतले.

AI चा वापर करून तयार केलेले पोस्टर्स चर्चेत

दिल्लीत नीट पेपर लीकविरोधात जेन झी पिढीने मोठे आंदोलन केले होते. त्यापासून प्रेरणा घेऊन आता जेन अल्फा पिढीने क्रांती घडवली आहे. डिजिटल युगात वाढलेल्या या मुलांनी आंदोलनासाठी AI जनित पोस्टर्स, घोषणा आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला. या लहान मुलांनी दाखवून दिले की, ते केवळ डिजिटल जगातच नाही तर प्रत्यक्ष जमिनीवरही आपल्या हक्कांसाठी लढू शकतात.

या आंदोलनातली सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे या लहान मुलांनी आंदोलनासाठी जे पोस्टर्स आणि बॅनर्स बनवले होते, ते त्यांनी एआयचा वापर करून मोबाईलवर डिझाइन केले होते आणि त्याचे प्रिंट काढून आणले होते. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ व्हायरल होताच, तिथलं अख्खं प्रशासन हादरलं. जो जिल्हा शिक्षण अधिकारी महिनोनमहिने लोकांचे अर्ज कचऱ्याच्या डब्यात टाकायचा, तो अधिकारी स्वतः धावत पळत शाळेच्या गेटवर आला. त्या लहान मुलांसमोर त्याने हात जोडले आणि लिहून दिलं की २४ तासांत पंखे लावतो आणि एका महिन्यात बेंच देतो. तेव्हा कुठे या पोरांनी कुलूप उघडलं. अवघ्या ५ तासांत या पोरांनी सरकारला आणि प्रशासनाला गुडघ्यावर आणलं. ही पोरं जर आत्ता इयत्ता सहावी-सातवीत असताना अख्ख्या शाळेला कुलूप ठोकून प्रशासनाला झुकवू शकतात, तर ही पोरं जेव्हा तरुण होतील, जेव्हा देशाच्या राजकारणात आणि अर्थकारणात येतील, तेव्हा हे काय धिंगाणा घालतील …..

डिजिटल पिढीचे आंदोलन पारंपरिक आंदोलनांपेक्षा कसे वेगळे?

ही पोरं जितकी भीतीदायक वाटतात, तितकीच हुशार आणि बिनधास्त आहेत. जेन झीने ( Gen Z ) जे बंड सुरू केलं होतं, त्याला या पोरांनी क्रांतीचं रूप दिलंय. जुन्या पिढ्या कशा होत्या, अंधश्रद्धा, जुन्या चालीरिती, जातीवाद, प्रांतिकता या सगळ्यामध्ये अडकलेल्या होत्या. मास्तरांनी मारलं तरी मास्तर आमच्या भल्यासाठीच मारतात असं म्हणून गप बसणाऱ्या होत्या. पण जेन अल्फाची पोरं या सगळ्या पारंपरिक बंधनांना लाथाडणारी आहेत. त्यांना जात, धर्म, प्रांत यापेक्षा स्वतःचे हक्क, स्वतःची स्पेस आणि स्वतःचं स्वातंत्र्य जास्त महत्त्वाचं वाटतं. युपीच्या आंदोलनात आपण काय बघितलं? तिथे ६ वीपासूनची पोरं जात पात विसरून फक्त आपल्या शाळेच्या सुविधेसाठी एकत्र आली. त्यांनी थेट प्रशासनाला आव्हान दिलं. याचा अर्थ असा की, ही पिढी अन्यायाविरुद्ध गप्प बसणारी नाही. जर उद्या देशात किंवा समाजात काही चुकीचं घडत असेल, तर हे पोरं मेणबत्त्या घेऊन शांतता मोर्चा काढणार नाहीत, तर हे डिजिटल स्ट्राईक करतील किंवा थेट सत्तेच्या खुर्चीला कुलूप ठोकतील. हा त्यांचा निर्भीडपणा, हा त्यांचा रोखठोक स्वभाव चांगलाही आहे, कारण यामुळे हुकूमशाही किंवा चुकीच्या गोष्टींना पायबंद बसेल.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts