Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • IPL 2027 आधी हार्दिकचा मोठा प्लॅन फसला? गुजरातमध्ये कमबॅक, पण कॅप्टन्सीवर…
क्रीडा

IPL 2027 आधी हार्दिकचा मोठा प्लॅन फसला? गुजरातमध्ये कमबॅक, पण कॅप्टन्सीवर…

Hardik Pandya
18
Hardik Pandya: IPL २०२७ आधी हार्दिक पंड्याचा गुजरात टायटन्समध्ये परतण्याचा प्लॅन जवळपास मार्गी लागला होता. मात्र कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून ही चर्चा फिस्कटल्याचे वृत्त आहे. शुभमन गिलला हार्दिकच्या पुनरागमनाची हरकत नव्हती, पण नेतृत्वाच्या प्रश्नावर फ्रँचायझीने माघार घेतली.

IPL २०२७ आधी हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्समध्ये पुनरागमनाची चर्चांना वेग आला होता. मात्र, कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून ही संभाव्य डील अडल्याचे वृत्त समोर आले आहे. हार्दिकला गुजरातमध्ये परतण्याची इच्छा होती, तर फ्रँचायझीही त्याच्या पुनरागमानाबाबत सकारत्मक होती. मात्र, नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे राहणार, हा प्रश्न निर्णायक ठरला.

आता शुभमन गिलची भूमिका काय?

गुजरात टायटन्सचा सध्याचा कर्णधार शुभमन गिल याच्याशी हार्दिकच्या पुनरागमनाबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. हार्दिक पुन्हा संघात आल्यास गिलला त्याबाबत आक्षेप नव्हता, असे सांगितले जात आहे. मात्र, हार्दिकला संघात परतल्यानंतर पुन्हा कर्णधारपद हवे असल्याची अट समोर आली.
याच मुद्द्यावर गुजरात फ्रँचायझीने सहमती दर्शवली नसल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे हार्दिकच्या कमबॅकची चर्चा पुढे जाऊ शकली नाही.

हेही वाचा: तुरुंगातच इम्रान खान यांचा मृत्यू? पाकिस्तानी पत्रकाराच्या दाव्याने वाढलं गूढ+

हार्दिक कर्णधारपदावरून का वाद?

हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्सला २०२२ मध्ये पदार्पणाच्या हंगामातच विजेतेपद मिळवून दिले होते. त्यानंतर २०२६ मध्येही गुजरातने अंतिम फेरी गाठली. त्यामुळे गुजराटसोबत हार्दिकचा कर्णधार म्हणून चांगला रेकॉर्ड आहे.

मात्र, सध्या शुभमन गिल संघाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे आता हार्दिकला पुन्हा कर्णधार बनवायचे की गिलवरच आता विश्वास कायम ठेवायचा, हा फ्रँचायझीसमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे.

मुंबई इंडियन्ससोबत हार्दिकचे भविष्य काय?

हार्दिकच्या गुजरातमध्ये परतण्याच्या चर्चेमुळे मुंबई इंडियन्ससोबतच्या त्याच्या भवितव्यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. २०२४ हार्दिकने मुंबईत पुनरागमन केले आणि त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले.

मात्र, संघाच्याकामगिरीत अपेक्षित सातत्य राहिले नाही. त्यामुळे हार्दिकच्या नेतृत्वावर सातत्याने चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत IPL 2027 पूर्वी खेळाडूंच्या ट्रेड आणि संघबदलाच्या चर्चांना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

हार्दिकचा पुढचा संघ कोणता?

सध्या हार्दिक पंड्या गुजरात टायटन्समध्ये परतणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. कर्णधारपदाच्या मुद्द्यावर चर्चा अडल्याचे वृत्त असले तरी आगामी काळात परिस्थिती बदलू शकते.

त्यामुळे IPL 2027 मध्ये हार्दिक मुंबई इंडियन्सकडूनच खेळणार की त्याचा नवा संघ असेल, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts