Digital India: मोबाइल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे भारतातील सरकारी सेवा, डिजिटल पेमेंट, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत.
भारतामध्ये डिजिटल (Digital India) तंत्रज्ञानाचा वापर गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढला असून, त्याचा थेट परिणाम प्रशासन, उद्योग, शिक्षण आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर दिसून येत आहे. कागदपत्रे, कार्यालयीन फेऱ्या आणि पारंपरिक प्रक्रियांऐवजी अनेक सरकारी सेवा आता ऑनलाईन उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे सेवा मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होत आहे.
डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (Digital Public Infrastructure) या परिवर्तनाचा महत्वाचा आधार ठरल्या आहेत. आधार, UPI, digilocker, UMANG आणि direct benefit transfer यांसारख्या डिजिटल सुविधांकडे नागरिकांना सरकारी सेवा आणि आर्थिक व्यवहार अधिक सहजपणे करता येत आहेत.
हेही वाचा: मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा झटका? रिक्षा-टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढीची शक्यता; नवे दर किती असतील?
डिजिटल अर्थव्यवस्थेचा वाढता प्रभाव (Digital Public Infrastructure)
भारताच्या अर्थव्यवस्थेत डिजिटल क्षेत्राचा वाटा सध्या सुमारे 12 ते 14 टक्के असल्याचे अधिकृत माहितीत नमूद करण्यात आले आहे. पुढील दशकात हा वाटा 20 टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
UPI मुळे डिजिटल पेमेंटमध्ये भारताने (UPI India) मोठी आघाडी घेतली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात UPI वर 24,161 कोटींपेक्षा अधिक व्यवहार झाले. देशांतर्गत वापरासोबतच भारताची ही पेमेंट प्रणाली अनेक परदेशी देशांमध्येही स्वीकारली जात आहे.
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला मोठी चालना
‘मेक इन इंडिया’ आणि उत्पादनाशी संबंधित विविध प्रोत्साहन योजनांमुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राचा विस्तार झाला आहे. 2014-15 मध्ये 1.9 लाख कोटी रुपयांचे असलेले इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन 2025-26 मध्ये 13.11 लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
मोबाइल उत्पादनातही भारताची क्षमता वाढली आहे. देश आता जगातील प्रमुख मोबाइल उत्पादन केंद्रांपैकी एक बनला असून, या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. (LS Marathi News Channel)
इंटरनेट आणि 5Gचा विस्तार
इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणातवाढली असून, 5G सेवा देशातील जवळपास सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचली आहे. Bharat Net आणि PM-WANI सारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील डिजिटल कनेक्टिव्हिटीही मजबूत होत आहे.
शिक्षण आणि कौशल्य विकासातही डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. DigiLocker, DIKSHA, SWAYAM, APAAR आणि Skill India Digital Hubमुळे विद्यार्थ्यांना आणि तरुणांना डिजिटल सुविधा उपलब्ध होत आहेत.
एकूणच, डिजिटल पायाभूत सुविधांमुळे भारतातील प्रशासन अधिक नागरिककेंद्रित होत असून, नवउद्योजकता, रोजगार, डिजिटल व्यवहार आणि आर्थिक विकासासाठी नव्या संधी निर्माण होत आहेत.









