Breaking News :
  • Home
  • एजुकेशन- जॉब
  • तरुणांसाठी गुड न्यूज! रेल्वेत 1,421 पदांसाठी भरती; जाणून घ्या कुठे आणि कसा करायचा अर्ज
एजुकेशन- जॉब

तरुणांसाठी गुड न्यूज! रेल्वेत 1,421 पदांसाठी भरती; जाणून घ्या कुठे आणि कसा करायचा अर्ज

Railway Recruitment 2026
7
Railway Recruitment 2026: रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे विभागाकडून तब्बल १,४२१ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा? जाणून घेऊया संपूर्ण अर्ज प्रक्रिया.

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी रेल्वे विभागाकडून (Railway Jobs 2026) महत्वाची संधी उपलब्ध झाली आहे. ईस्ट कोस्ट रेल्वेने जनरल डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन (GDCE) अंतर्गत विविध पदांवर भरती जाहीर केली आहे. या प्रक्रियेत एकूण 1,421 पदे भरली जाणार आहेत.

या भरतीमध्ये असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilot Recruitment) , स्टेशन मास्टर (Station Master Recruitment) , गुड्स ट्रेन मॅनेजर (Goods Train Manager Recruitment) , ज्युनिअर इंजिनिअर (Junior Engineer Railway Jobs) , टेक्निशियन (Railway Technician Recruitment) यांसह इतर पदांची समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

हेही वाचा: रक्षाबंधनाला शेतकऱ्यांना मिळणार मोठं ‘गिफ्ट’? PM Kisanचा 24वा हप्ता ‘या’ महिन्यात येणार!

अर्जासाठी किती दिवसांची मुदत?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १५ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना १४ सप्टेंबर २०२६ पर्यंत RRC Bhubaneswar या अधिकृत वेबसाईट https://www.rrcbbs.org.in/ वर अर्ज करता येणार आहे.

उमेदवारांनी अर्ज भरताना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक तपासावी. अंतिम मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी GDCE 2026 अधिकृत नोटिफिकेशन PDF पाहू शकतात.

कोणत्या पदांसाठी किती जागा?

असिस्टंट लोको पायलट: 1,046
स्टेशन मास्टर: 12
गुड्स ट्रेन मॅनेजर: 284
ज्युनिअर इंजिनिअर: 22
टेक्निशियन: 51
ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट: 4
कमर्शियल क्लर्क कम तिकीट कलेक्टर: 2

उमेदवारांनी अर्ज कसा करायचा?

या भरतीसाठी RRC Bhubaneswar या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. एकापेक्षा अधिक पदांसाठी पात्र असलेले उमेदवार संबंधित पदांसाठी पसंती नोंदवू शकतात; मात्र त्यांना स्वतंत्रपणे अनेक अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत भरती अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे आणि माहिती तयार ठेवून RRC भुवनेश्वरच्या अधिकृत वेबसाइटवरील अर्ज लिंकचा वापर करावा.

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड संबंधित पदाच्या पात्रतेनुसार विविध टप्प्यांमध्ये केली जाईल. सुरुवातीला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) घेतली जाऊ शकते. काही पदांसाठी CBT नंतर कॉम्प्युटर बेस्ड अॅप्टिट्यूड टेस्ट किंवा टायपिंग स्किल टेस्ट लागू असेल.

यानंतर पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. शेवटच्या टप्प्यात आवश्यकतेनुसार वैद्यकीय तपासणी केली जाईल.

परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग

CBT परीक्षेत चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंगची तरतूद आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाला दिलेल्या गुणांपैकी एक-तृतीयांश गुण वजा केले जातील. त्यामुळे उमेदवारांनी प्रश्न सोडवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

CBAT परीक्षेला मात्र निगेटिव्ह मार्किंग लागू नसल्याचे भरती प्रक्रियेत नमूद करण्यात आले आहे. परीक्षेतील किमान पात्रता गुण उमेदवारांच्या प्रवर्गानुसार निश्चित करण्यात आले आहेत.

अर्ज करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा

उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी आपली पात्रता, शैक्षणिक अर्हता, अनुभव आणि इतर आवश्यक निकष तपासणे महत्त्वाचे आहे. अर्जामध्ये चुकीची माहिती भरल्यास उमेदवारीवर परिणाम होऊ शकतो.

रेल्वेतील नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts