Bank Strike September 11 2026: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या, ११ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकारी संपावर जाणार आहेत. त्यामुळे बँकांच्या नियमित कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नेमकी कोणती मागणी आहे आणि पुढे किती दिवस संप होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती.
बँकेशी (Bank Strike) संबंधित महत्त्वाचे व्यवहार करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांनी पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतली असून, ११ सप्टेंबर (September 11 2026) रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी बँकांच्या नियमित सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
देशातील विविध बँक कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) कडून संपाचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. संप मागे घेण्याबाबत सरकार आणि बँक संघटनांमध्ये चर्चा झाली होती. मात्र, संघटनांच्या प्रमुख मागण्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Bank Strike 2026)
हेही वाचा: Pithori Amavasya 2026: बैलपोळ्यासोबत आज 64 योगिनींची पूजा का केली जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
पाच दिवसांचा बँकिंग आठवडा ही प्रमुख मागणी (Five Day Banking Week Demand)
बँक कर्मचाऱ्यांची सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे आठवड्यात केवळ पाच दिवस बँकिंग कामकाज लागू करणे. सध्या अनेक बँकांमध्ये काही शनिवारी कामकाज केले जाते. पाच दिवसांचा आठवडा लागू झाल्यास शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांची साप्ताहिक सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.
संघटनांचे म्हणणे आहे की, या मागणीवर सरकारकडून ठोस निर्णय किंवा अंमलबजावणीची स्पष्ट वेळमर्यादा मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.
We call upon all our affiliates and members to go ahead and implement the strike on 11th Sept., 2026.
Comrades, our demand is justified. Our strike call is justified. Fortify our unity and make the strike a total success. #StrikeAheadMarchOn pic.twitter.com/oLm2esGW94
— National Confederation of Bank Employees (@ncbeofficial) September 10, 2026
कोणत्या बँका बंद राहणार?
११ सप्टेंबर २०२६ रोजी (Banks Closed September 11) होणाऱ्या UFBUच्या देशव्यापी संपाचा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार यामध्ये प्रमुखतः:
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
बँक ऑफ बडोदा
पंजाब नॅशनल बँक (PNB)
बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडिया
इंडियन बँक
कॅनरा बँक
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
यांसह इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखांमधील कामकाजावर परिणाम होऊ शकतो. SBI आणि Bank of Baroda यांनी संपाची नोटीस मिळाल्याचे जाहीर केले आहे. LS Marathi News
पुढील आंदोलनाचीही तयारी
११ सप्टेंबरचा संप हा केवळ एकदिवसीय आंदोलन न राहता पुढील मोठ्या आंदोलनाची सुरुवात ठरू शकतो. मागण्यांवर तोडगा न निघाल्यास २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा देशव्यापी संप करण्याची भूमिका संघटनांनी घेतली आहे. त्यानंतर २६ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या एसबीआयलाही ११ सप्टेंबरच्या संपाची नोटीस मिळाली आहे. ग्राहकांना सेवा देण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे. मात्र कर्मचारी मोठ्या संख्येने संपात सहभागी झाल्यास शाखांमधील दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे ग्राहकांनी शक्य असल्यास ११ सप्टेंबरपूर्वी बँकेशी संबंधित अत्यावश्यक कामे पूर्ण करून घेणे योग्य ठरू शकते. तसेच ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल पेमेंट सेवा उपलब्ध आहेत की नाहीत, याचीही खात्री करून घेणे फायदेशीर ठरेल.



