MPSC Group C Prelims Exam 2026: MPSC विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. गट क संयुक्त पूर्व परीक्षा रद्द झाली असून नवी तारीख जाहीर करण्यात आले आहे. चला तर जाणून घेऊयात संपूर्ण माहिती
MPSC म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर येते ती सरकारी नोकरी आणि अधिकारी होण्याचं स्वप्न. राज्यातील असंख्य तरुण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरकारी सेवेत दाखल होऊन अधिकारी बनण्याचं ध्येय उराशी बाळगून मेहनत करत असतात. मात्र, या स्पर्धेत काहींचं स्वप्न पूर्ण होतं, तर काहींना अपयशाचा सामना करावा लागतो.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट क संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी नियोजित असलेली गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाने परीक्षेसाठी ३ जानेवारी २०२७ ही नवी तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांना आता अभ्यासासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.
हेही वाचा: Pithori Amavasya 2026: बैलपोळ्यासोबत आज 64 योगिनींची पूजा का केली जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट
गट क संयुक्त पूर्व परीक्षा ही राज्यातील विविध शासकीय पदांसाठी महत्त्वाची मानली जाते. या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी गेल्या अनेक महिन्यांपासून अभ्यास, सराव परीक्षा आणि पुनरावृत्तीवर भर देत आहेत. अशा परिस्थितीत परीक्षेची तारीख अचानक बदलल्याने काही उमेदवारांना दिलासा मिळाला असला, तरी अनेकांच्या अभ्यासाचे नियोजनही बदलणार आहे.
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.https://t.co/YjNi18wrfJ pic.twitter.com/rzXYSg7k8K
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) September 9, 2026
दरम्यान, राज्यातील विविध विद्यार्थी संघटनांकडून परीक्षा आणि भरती प्रक्रियेसंदर्भात मागण्या मांडल्या जात आहेत. पुण्यासह काही ठिकाणी MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळेही वातावरण चर्चेत आले होते. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरही राज्यातील परिस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता काय करावे?
नवी तारीख जाहीर झाल्यामुळे उमेदवारांनी आता उरलेल्या कालावधीचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाची पुन्हा उजळणी, मागील प्रश्नपत्रिकांचा सराव, नियमित टेस्ट सिरीज आणि कमकुवत विषयांवर विशेष लक्ष देऊन तयारी अधिक मजबूत करता येईल.
३ जानेवारी २०२७ ही परीक्षा आता लक्ष्य मानून उमेदवारांनी नव्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करावे. परीक्षेच्या तारखेसह प्रवेशपत्र, केंद्र, अर्ज किंवा इतर कोणत्याही बदलाबाबतची माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी MPSCच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.
परीक्षा पुढे ढकलली असली, तरी स्पर्धेची तीव्रता कायम राहणार आहे. त्यामुळे अतिरिक्त वेळ हा संधी म्हणून वापरून तयारी अधिक भक्कम करणेच उमेदवारांसाठी फायदेशीर ठरेल.








