• Home
  • ताज्या बातम्या
  • जाहिरात 7 महिने उशिरा; हजारो स्वप्नं अपात्र! पुण्यातील आंदोलनात विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय होत्या मागण्या?
एजुकेशन- जॉब

जाहिरात 7 महिने उशिरा; हजारो स्वप्नं अपात्र! पुण्यातील आंदोलनात विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय होत्या मागण्या?

MPSC PSI Recruitment

MPSC PSI Recruitment: पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन पाहायला मिळाले असून, पोलीस उपनिरीक्षक भरतीतील वयोमर्यादेच्या नियमांवरून वाद अधिक तीव्र झाला आहे. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की भारतीची जाहिरात सुमारे ७ महिने उशिरा प्रसिद्ध झाली, मात्र वय गणनेची तारीख बदलली नसल्याने हजारो उमेदवार अपात्र ठरले आहेत.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षा जानेवारी २०२६ मध्ये होणार असून जाहिरात जुलै २०२५ मध्ये प्रसिद्ध झाली. तरीही वयाची गणना नोव्हेंबर २०२५ च्या आधारे केल्याने अनेक उमेदवार “ओव्हरएज” ठरले. यामुळे अनेक वर्षाचा अभ्यास आणि तयारी वाया गेल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे.

हेही वाचा: मुंबई, कोकण, पुण्यासह अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; IMD चा मोठा इशारा

पुण्यातील शास्त्री रोड परिसरात मध्यरात्रीपासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. हातात फलक घेऊन त्यांनी “वयोमर्यादा वाढवा” आणि “न्याय द्या” अशा घोषणा दिल्या. मोठ्या संख्येने विद्यार्था या आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

या आंदोलनात विद्यार्थ्यांनी स्पष्टपणे दोन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.

पहिली मागणी म्हणजे वयोमर्यादा किमान दोन वर्षांची सवलत देण्यात यावी.

दुसरी मागणी म्हणजे वय गणनेसाठी 1 जानेवारी 2025 ही तारीख गृहित धरावी, कारण ही परीक्षा 2025-26 च्या भरती प्रक्रियेतील आहे.

विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की आयोगाच्या उशिरामुळे उमेदवारांना अन्याय सहन करावा लागत आहे. UPSC सारख्या संस्थांमध्ये अधिक सुसंगत नियम लागू केले जातात, तसेच राज्यभरातील इतर भरती प्रक्रियांमध्ये वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे, त्यामुळे MPSC मध्येही समान न्याय मिळावा अशी मागणी होत आहे.

राजकीय प्रतिक्रिया

या आंदोलनाची दखल काही राजकीय नेत्यांनी घेतली असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

आंदोलनाचा इशारा

विद्यार्थ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि राज्यभर विस्तार केला जाईल. या प्रकरणामुळे MPSC भरती प्रक्रिया आणि नियमांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts