CAT 2026 Registration: एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रतिष्ठित कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT २०२६) देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) कडून कॅट २०२६ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, अर्ज प्रक्रिया ३ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार आहे.
पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. कॅट परीक्षेद्वारे देशातील विविध आयआयएम तसेच इतर नामाकिंत व्यवस्थापन संस्थांमध्ये एमबीए आणि पीजी व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो.
हेही वाचा: गावागावात पुन्हा राजकीय हालचालींना वेग; जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लवकरच?
CAT २०२६ परीक्षा कधी होणार? (CAT 2026 Registration)
जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, CAT २०२६ परीक्षा २९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित केली जाणार आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र ( Admin card) ४ नोव्हेंबर २०२६ पासून डाउनलोड करता येईल.
कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात? (CAT 2026 Eligibility Criteria Explained)
सामान्य, EWS आणि NC-OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी: पदवी परीक्षेत किमान 50 टक्के गुण आवश्यक आहेत.
SC, ST आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी: पदवीमध्ये किमान 45 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
मान्यताप्राप्त व्यावसायिक पदवीधारक (CA, CS, ICWA/CMA, FIAI) उमेदवार देखील पात्र असतील.
पदवीच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थीही CAT २०२६ साठी अर्ज करू शकतात.
अर्ज शुल्क किती असेल?
CAT 2026 साठी अर्ज करताना उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरावे लागणार आहे.
SC/ST आणि दिव्यांग उमेदवार: १३५० रुपये
इतर सर्व प्रवर्गातील उमेदवार: २७०० रुपये
CAT 2026 साठी अर्ज कसा कराल? (Step-by-Step Guide to Apply for CAT 2026)
कॅट परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:
सर्वप्रथम अधिकृत CAT च्या iimcat.ac.in या वेबसाइटला भेट द्या.
नवीन उमेदवार नोंदणी (New Candidate Registration) पर्यायावर क्लिक करा.
आवश्यक वैयक्तिक माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.
लॉगिन करून अर्जातील उर्वरित माहिती भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज शुल्क भरा.
अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट जतन करून ठेवा.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना
उमेदवारांनी अर्ज भरताना आपली वैयक्तिक माहिती, कागदपत्रांमध्ये कोणतीही चूक होणार नाही याकडे लक्ष ठेवावे. अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी सर्व माहिती तपासणे आवश्यक आहे.









