Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • गावागावात पुन्हा राजकीय हालचालींना वेग; जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लवकरच?
राजकारण

गावागावात पुन्हा राजकीय हालचालींना वेग; जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लवकरच?

Maharashtra Zilla Parishad

Maharashtra Zilla Parishad: राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आता हालचालींना वेग येण्याशी शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका घेण्याची तयारी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दर्शवल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुकांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास या निवडणुका डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे रखडल्या आहेत. निवडणुका लांबल्याने अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सध्या प्रशासकाच्या माध्यमातून चालवला जात आहे.

हेही वाचा: पावसाळ्यात त्वचा राहील तजेलदार आणि निरोगी; फक्त ‘या’ स्किनकेअर टिप्स करा फॉलो

लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे या निवडणुका लवकर घेण्याची मागणी राजकीय पक्षांकडून आणि नागरिकांकडून केली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयात सरकारची भूमिका स्पष्ट (Maharashtra Zilla Parishad)

जिल्हा परिषद निवडणुकांशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीदरम्या राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी तयारी असल्याचे सांगितले आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे रखडलेल्या निवडणुकांना पुढे नेण्यासाठी सकारत्मक वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुका घेण्यापूर्वी प्रभागरचना, आरक्षण निश्चिती, मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या सर्व बाबी पूर्ण झाल्यानंतर राज्य निवडणूक अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल.

डिसेंबरमध्ये होऊ शकतात निवडणूका

न्यायालयीन अडचणी दूर झाल्या आणि निवडणुकीसाठी आवश्यक तयारी वेळेत पूर्ण झाली, तर डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका घेण्याची शक्यता आहे.

या निवडणुकांना ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Zilla Parishad) मोठे महत्व आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून पक्षांची संघटनात्मक ताकद, स्थानिक नेतृत्व आणि आगामी राजकीय समीकरणांची दिशा स्पष्ट होत असते.

राजकीय पक्षांची तयारी सुरू होणार?

निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण होताच राजकीय पक्षांमध्येही हालचाली वाढण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांची चाचपणी, स्थानिक पातळीवरील समीकरणे आणि प्रचाराची रणनीती यावर पक्षांकडून काम सुरू होऊ शकते.

दरम्यान, सरकारने सर्वोच्च न्यायालयात निवडणुका घेण्याची तयारी दर्शवल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची प्रतीक्षा करणाऱ्या इच्छुक उमेदवारांमध्ये तसेच राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts