Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • ना दारू, ना सिगारेट… तरीही आरोग्य धोक्यात! कारण आहे तुमच्या आजूबाजूची ‘ही’ गोष्ट
आरोग्य

ना दारू, ना सिगारेट… तरीही आरोग्य धोक्यात! कारण आहे तुमच्या आजूबाजूची ‘ही’ गोष्ट

Loneliness Health Effects
7
Loneliness Health Effects: तुम्ही दारू-सिगारेटपासून दूर असूनही आरोग्य धोक्यात येऊ शकतं. कारण सततचा एकटेपणा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो. नेमकी ही गोष्ट काय आहे, जाणून घ्या.

दारू आणि सिगारेट आरोग्यासाठी घातक आहेत, हे सर्वानाच माहित आहे. पण तुम्ही या दोन्ही गोष्टींपासून पूर्णपणे दूर असाल, तर आरोग्यची काळजी घेण्याची गरज नाही असं नाही. कारण आपल्या आजूबाजूला असलेली एक साधी वाटणारी गोष्ट शरीर आणि मनावर हळूहळू परिणाम (loneliness health effects) करू शकते. ती म्हणजे एकटेपणा.

आजच्या डिजिटल युगात आपण सतत कोणाच्या ना कोणाच्या संपर्कात असतो. फोन, सोशल मिडिया (social isolation health risks) आणि ऑनलाईन चॅटिंगमुळे संपर्क वाढला असला तरी प्रत्यक्ष आयुष्यातील भावनिक जवळीक अनेकदा कमी होताना दिसते. त्यामुळे गर्दीत असूनही ‘आपलं कुणीच नाही’ अशी भावना अनेकांना जाणवते.

हेही वाचा: 

एकटेपणाचा शरीरावरही परिणाम

एकटेपणा हा केवळ मानसिक स्थिती (mental health loneliness) नसून त्याचा शारीरिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळ एकटेपणाची भावना राहिल्यास शरीरातील तणावाची पातळी वाढू शकते. सततच्या तणावामुळे रक्तदाबासह हृदयाशी संबंधित काही आरोग्यजोखमी वाढण्याची शक्यता असते. विशेषतः एखादी व्यक्ती = दीर्घकाळ सामाजिकदृष्ट्या अलिप्त राहिल्यास तिच्या झोपेच्या सवयी, शारीरिक हालचाल आणि दैनंदिन जीवनशैलीवरही परिणाम होऊ शकतो.

मनावर वाढतो ताण

एकटेपणा सर्वाधिक परिणाम मानसिक आरोग्यावर जाणवू शकतो. जवळच्या व्यक्तीशी मनातील भावना शेअर करता न आल्याने चिंता, अस्वस्थता आणि निराशा वाढू शकते. काही लोकांमध्ये दीर्घकाळ एकटेपणामुळे नैराश्याची लक्षणंही दिसू शकतात.

मग काय करावं?

एकटेपणा जाणवत असल्यास स्वतःला पूर्णपणे लोकांपासून दूर ठेवण्याऐवजी कुटुंबीय किंवा मित्रांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. आवडीचे छंद जोपासा, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि गरज भासल्यास मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या. दारू-सिगारेट टाळणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच निरोगी सामाजिक आणि भावनिक आयुष्य जपणंही महत्त्वाचं आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts