Khakhra Potato Chaat Recipe: तुम्हालाही रोज बिस्कीट आणि नमकीन खाऊन कंटाळला असाल, तर चहासोबत कुरकुरीत खाखरा- बटाटा चाट नक्की ट्राय करा. झटपट तयार होणारी ही चटपटीत रेसिपी संध्याकाळच्या स्नॅकसाठी एकदम परफेक्ट आहे.
दररोज चहासोबत बिस्कीट, टोस्ट किंवा नमकीन खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी काहीतरी वेगळं करून पाहा. घरात उपलब्ध असलेल्या साध्या साहित्यापासून तयारी होणारी खाखरा चाट हा यासाठी उत्तम पर्याय आहे. कुरकुरीत खाखरा, ताज्या भाज्या, चटणी आणि मसाल्यांच्या भन्नाट मेळ या पदार्थाला खास चव देतो.
संध्याकाळच्या चहासाठी हलका स्नॅक (Tea Time Snack) हवा असेल किंवा अचानक घरी आलेल्या पाहुण्यांसाठी काहीतरी झटपट तयार करायचे असेल, तर कुरकुरीत खाखरा- बटाटा चाट (Khakhra Potato Chaat Recipe) ही रेसिपी नक्की उपयोगी पडेल. शिवाय तुमच्या आवडीनुसार यात वेगवेगळ्या भाज्या आणि इतर पदार्थही घातला येतात. (Healthy Snack Recipe)
हेही वाचा: थिएटरमध्ये फ्लॉप, पण OTTवर छप्परफाड कमाई? अक्षयच्या ‘हैवान’ची 80 कोटींची डील चर्चेत
खाखरा चाटसाठी लागणारे साहित्य (Crispy Khakhra Chaat)
2 ते 3 कुरकुरीत खाखरे
हिरवी चटणी
उकडलेली मूग किंवा स्प्राउट्स
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेला टोमॅटो
बारीक चिरलेली काकडी
बारीक चिरलेली शिमला मिरची
उकडलेला बटाटा
चाट मसाला
थोडेसे किसलेले पनीर
बारीक शेव
चिरलेली कोथिंबीर
डाळिंबाचे दाणे
लिंबाचा रस
अशी तयार करा खमंग खाखरा- बटाटा चाट (Easy Snack Recipe)
सर्वप्रथम खाखरा एका प्लेटमध्ये ठेवा. खाखरा जास्त पातळ नसावा, याची काळजी घ्या. त्यामुळे त्यावर चटणी आणि इतर साहित्य घातल्यानंतरही तो बराच वेळ कुरकुरीत राहतो. LS Marathi Channel
आता खाखऱ्यावर हिरवी चटणी पसरवा. त्यावर उकडलेली मूग, कांदा, टोमॅटो, काकडी आणि शिमला मिरची घाला. त्यानंतर उकडलेल्या बटाट्याचे छोटे तुकडे पसरवा.
सगळ्या साहित्यावर चाट मसाला आणि थोडासा लिंबाचा रस शिंपडा. त्यावर किसलेले पनीर आणि शेव घाला. शेवटी कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे टाकून चाट सजवा.
तुम्हाला थोडी आंबट-गोड चव आवडत असेल तर त्यात चिंचेची गोड चटणीही घालू शकता. तसेच कच्चा आंबा उपलब्ध असल्यास त्याचे बारीक तुकडे घातल्याने चाट आणखी चविष्ट लागते.
ही चाट (Easy Snack Recipe) तयार केल्यानंतर लगेच सर्व करा, म्हणजे खाखऱ्याचा कुरकुरीतपणा कायम राहील. कमी वेळात तयार होणारी, चविष्ट आणि रंगीबेरंगी खाखरा चाट संध्याकाळच्या चहासोबत नक्कीच एकदा करून पाहा.




