Breaking News :
Ganeshotsav 2026

लालबाग राजाच्या VIP दर्शनासाठी किती पैसे लागतात? काय प्रोसेस असते?

Lalbaugcha Raja VIP Darshan
4

Lalbaugcha Raja VIP Darshan : गणेशोत्सवाच्या काळात राज्यभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते…घराघरात गणपती बाप्पा आपल्याला विराजमान पाहायला मिळतात…पण राज्यातील काय देशातील सर्वात प्रसिद्ध गणपती म्हटलं की डोळ्यांसमोर उभी राहते ती मुंबईतील लालबागच्या राजाची भव्य आणि देखणी मूर्ती… दरवर्षी लाखो भाविक राजाच्या दर्शनासाठी मुंबईत दाखल होतात… केवळ सर्वसामान्य जनताच नाही, तर देश-विदेशातील उद्योगपती, राजकीय नेते आणि बॉलिवूडचे मोठे सेलिब्रिटीही राजाच्या चरणी लीन होण्यासाठी लालबागमध्ये गर्दी करतात… नवसाला पावणारा गणपती म्हणून जगभर ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचा इतिहास आणि तिथली दर्शनाची व्हीआयपी व्यवस्था हा नेहमीच कौतुकाचा आणि तितकाच चर्चेचा विषय राहिला आहे…पण तुम्हाला एक प्रश्न पडलाय का? की लालबागच्या राजाच्या व्हिआयपी दर्शनाची परंपरा कधीपासून सुरू झाली आहे? लालबागच्या राजाच्या VIP दर्शनासाठी काय करावे लागले? VIP दर्शन कसं घेऊ शकतो?

लालबागचा राजा 2026: दर्शन कधीपासून सुरू झाले? ( Lalbaugcha Raja VIP Darshan )

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविकांची गर्दी असते…या लालबागच्या राजाची स्थापना 12 सप्टेंबर 1934 रोजी करण्यात आली होती… या स्थापनेमागे त्या काळातील स्थानिक कोळी बांधव आणि व्यापारी यांचा एक मोठा नवस कारणीभूत होता, असं म्हटलं जातं… 1932 च्या सुमारास ब्रिटिश राजवटीत लालबागच्या ‘पेरू चाळ’ परिसरातील उघड्यावर भरणारा स्थानिक बाजार बंद करण्यात आला होता… यामुळे तिथल्या स्थानिक फेरीवाल्यांचे आणि मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आणि त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला… या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आणि तिथे कायमस्वरूपी हक्काचा बाजार मिळावा यासाठी स्थानिक व्यापारी आणि मच्छिमारांनी मिळून मारुती आणि गणपती बाप्पाला नवस केला, अशी चर्चा आहे…. बाप्पाच्या कृपेने व्यापाऱ्यांना सध्या अस्तित्वात असलेली जागा मिळाली, असं म्हटलं जातं…. आपली इच्छा पूर्ण झाल्यामुळे आणि नवस पावल्यामुळे कृतज्ञता म्हणून स्थानिक कोळी बांधवांनी आणि व्यापाऱ्यांनी मिळून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली आणि 12 सप्टेंबर 1934 रोजी पहिल्यांदा तिथे गणपती बाप्पाची विधिवत स्थापना करण्यात आली, अशी माहिती आहे…

सुरुवातीच्या काळात लालबागचा राजा हा केवळ गिरणगाव आणि मुंबईतील स्थानिक कामगारांचा उत्सव होता… मात्र, हळूहळू बाप्पाच्या नवसाची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पसरली… 80 आणि 90 च्या दशकानंतर इथे येणाऱ्या भाविकांची गर्दी लाखोंच्या घरात पोहोचली… 2000 सालाच्या सुमारास जेव्हा लालबागच्या राजाचा चेहरा कायमस्वरूपी निश्चित करण्यात आला, तेव्हापासून हा उत्सव एका जागतिक ब्रँडच्या रूपात समोर आला… लाखोंच्या गर्दीमुळे दर्शनासाठी 20 ते 30 तास थांबावे लागू लागले… अशा वेळी सुरक्षेच्या कारणास्तव, तसेच पोलीस प्रशासन, शासकीय अधिकारी, चित्रपट सृष्टीतील कलाकार आणि मोठ्या देणगीदारांना जलद दर्शन घेता यावे यासाठी मंडळाने अधिकृतपणे अंतर्गत VIP दर्शन मार्गिका आणि पास व्यवस्था सुरू केली…हे सुरू झालं 2000 ते 2005 च्या दरम्यान…. सुरुवातीला ही व्यवस्था केवळ मोजक्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी होती, परंतु काळाच्या ओघात त्याला एका स्वतंत्र दर्शन व्यवस्थेचे स्वरूप प्राप्त झाले…

हेही वाचा : बाप्पाची गोष्ट, मुलांची मस्ती! वीकेंडला पाहा बाळ गणेशाचे ‘हे भन्नाट चित्रपट

VIP पास कसा मिळतो? ( Lalbaugcha Raja Ticket Price )Lalbaugcha Raja VIP Pass

लालबागच्या राजाच्या व्हीआयपी दर्शनाच्या तिकिटांची किंमत आणि पासेस किती रूपयांना असतो, असा प्रश्न नेहमची सर्वसामान्यांना पडतो… अनेकदा ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्या व्हीआयपी पास देण्याच्या नावाखाली भाविकांची लूट करतात.. परंतु वस्तूस्थिती अशी आहे की लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने वेळोवेळी जाहीर केले आहे की मंडळ व्हीआयपी दर्शनासाठी कोणतेही अधिकृत तिकीट विकत नाही किंवा पैशांच्या बदल्यात व्हीआयपी पास उपलब्ध करून देत नाही… बाप्पाचे दर्शन कायदेशीररित्या सर्वांसाठी विनामूल्य आहे… लालबागच्या राजासाठी तिरुपती बालाजी, सिद्धिविनायक मंदिरासारखी कोणतीही ऑनलाईन सशुल्क व्हीआयपी पास बुकिंगची सुविधा अस्तित्वात नाही… जे मोठे देणगीदार मंडळाला रुग्णालय, शिक्षण, सामाजिक कार्यासाठी मोठी आर्थिक मदत, गुप्त दान करतात, त्यांना सन्मानपूर्वक व्हीआयपी पास दिले जातात… तसंच वरिष्ठ सरकारी अधिकारी, राजकीय नेत्यांच्या शिफारस पत्राद्वारे मोजक्या पासेसचे वाटप केले जाते… परंतु, सर्वसामान्य नागरिक काउंटरवर जाऊन, ऑनलाईन पैसे देऊन थेट व्हीआयपी तिकीट खरेदी करू शकत नाही…

Lalbaugcha Raja VIP Darshan : जर एखाद्या भाविकाकडे मंडळाचा अधिकृत व्हीआयपी पास, निमंत्रण पत्रिका असेल, तरच त्याला या विशेष रांगेतून दर्शन घेता येते… सामान्य भाविकांच्या रांगेव्यतिरिक्त व्हीआयपी व्यक्तींसाठी मंडळाकडून एक स्वतंत्र प्रवेशद्वार आणि मार्गिका तयार केली जाते… इथे सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक असते आणि पास तपासल्याशिवाय कोणालाही सोडले जात नाही… सामान्य भाविकांप्रमाणेच व्हीआयपी पासधारकांसाठीही दोन मार्ग असतात… ज्यामध्ये मूर्तीच्या थेट मंचावर जाऊन बाप्पाच्या पाया पडता येणारी चरणस्पर्श रांग आणि केवळ दुरून बाप्पाचे दर्शन घेता येणारी मुखदर्शन रांग अशा दोन स्वरूपांचा समावेश असतो… व्हीआयपी पासच्या प्रकारानुसार मुख्य स्टेजवर जाण्याची परवानगी मिळते आणि यामुळे वेळेची मोठी बचत होऊन अवघ्या 20 मिनिटे ते 1 तासात भाविकांना दर्शन मिळू शकते…

अलीकडच्या काही वर्षांत लालबागच्या राजाच्या दरबारातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था आणि तिथली कथित व्हीआयपी संस्कृती हा मोठ्या वादाचा आणि टीकेचा विषय बनला आहे… सोशल मीडियावर दरवर्षी असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यामध्ये तासनतास रांगेत उभ्या असलेल्या सामान्य भाविकांना मंडळाचे कार्यकर्ते पुढे ढकलतातो, त्यांना 10 सेकेंदही दर्शन घेऊ दिले जात नाही… त्यांच्याशी उद्धट वर्तन करतात… तर सेलिब्रिटी आणि व्हीआयपी लोकांना बाप्पाच्या चरणाशी आरामात उभे राहून फोटो काढू दिले जातात… यामुळे सामान्य भक्तांमध्ये नाराजीचा सूर असतो… या वादावर मंडळाचे असे म्हणणे असते की दरवर्षी लाखो लोकांची गर्दी हाताळताना सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होतो… सेलिब्रिटी किंवा व्हीआयपी नेत्यांना सामान्य रांगेत सोडल्यास तिथे चेंगराचेंगरी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो… म्हणूनच सुरक्षेच्या कारणास्तव ही स्वतंत्र व्यवस्था राखणे प्रशासकीय दृष्ट्या गरजेचे असते…

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts