• Home
  • ताज्या बातम्या
  • दगडूशेठ बाप्पाला भावपूर्ण निरोप; रात्री 8.25 वाजता विसर्जन, हजारो भक्तांची उपस्थिती
Ganeshotsav 2026

दगडूशेठ बाप्पाला भावपूर्ण निरोप; रात्री 8.25 वाजता विसर्जन, हजारो भक्तांची उपस्थिती

Dagdusheth Ganpati Visarjan 2026
0

Dagdusheth Ganpati Visarjan 2026 : गणेशोत्सवाच्या सांगतेनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची भव्य विसर्जन मिरवणूक 25 सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडली. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘जय गणेश’च्या जयघोषात हजारो भाविकांनी बाप्पाला निरोप दिला.

बेलबाग चौकातून निघाला श्री दगडूशेठ बाप्पाचा रथ ( Dagdusheth Ganpati Visarjan 2026 )

सलग चौथ्या वर्षी दुपारी 4 वाजता बेलबाग चौकातून दगडूशेठ गणपतीच्या सांगता मिरवणुकीला सुरुवात झाली. श्री वक्रतुंड रथातून बाप्पाची मिरवणूक मार्गस्थ झाली. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मार्गावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मिरवणुकीमध्ये विविध वाद्य पथकांचा सहभाग होता. चौघडा, सनई, बँड तसेच केरळमधील चेंदा मेलम पथकाच्या सादरीकरणामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली. महिला आणि पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुख्य विसर्जन रथ टिळक चौकात पोहोचला. त्यानंतर रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी पांचाळेश्वर घाटावरील हौदात दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव दगडूशेठ गणपती ट्रस्टचा 134 वा गणेशोत्सव होता. विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रक्षेपणही ट्रस्टच्या सोशल मीडिया आणि YouTube माध्यमांवर करण्यात आले.

पुण्यातील गणेशोत्सवाची सांगता होत असताना मानाच्या पाच गणपतींसह दगडूशेठ गणपतीचेही विसर्जन झाले. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांनी उपस्थिती लावल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा : करवीरचा राजा गणपती कोसळला; विसर्जन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts