Amla Benefits: आवळा हे आकाराने लहान असले तरी पोषक घटकांनी समृद्ध फळ आहे. व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्समुळे आहारात त्याचा समावेश फायदेशीर ठरू शकतो. रोज आवळा खाल्ल्याने आरोग्याला नेमके कोणते फायदे मिळू शकतात आणि तो कसा खावा, जाणून घेऊया.
भारतीय आहारपद्धतीत आवळ्याला (Indian Gooseberry Benefits) विशेष महत्व आहे. चवीला आंबट-तुरट असलेले हे फळ अनेक पोषक घटकांनी समृद्ध असून, आयुर्वेदातही त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ च्या १३८ व्या उत्तर प्रदेशातील प्रतापगडच्या आवळ्याचा (Amla Health Benefits) उल्लेख केला होता. आवळ्यापासून (Amla Nutrition Facts) कँडी, रस, मुरंबा आणि लोणचे यांसारखी विविध उत्पादने (Amla Benefits for Health) तयार करून स्थानिक शेतकरी तसेच महिलांना रोजगाराच्या संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. (Amla Healthy Eating Tips)
मात्र, आवळ्याचे महत्व केवळ शेती आणि रोजगारापुरते मर्यादित नाही. या फळामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, डायबर आणि इतर अँटीऑक्सिडंट घटक आरोग्यसाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे आहारात आवळ्याचा समावेश करण्याचे काही फायदे जाणून घेऊया.
हेही वाचा: 29 September 2026 Horoscope: आज ‘या’ राशींची रखडलेली कामं मार्गी लागणार; पाहा तुमचं राशिभविष्य
रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर
आवळ्यामध्ये Vitamin C आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. व्हिटॅमिन सी शरीराच्या सामान्य रोगप्रतिकारक कार्यासाठी महत्वाचे पोषक तत्त्व आहे. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून आवळ्याचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होऊ शकते.
याशिवाय, व्हिटॅमिन सी शरीरात कोलाजन तयार करण्याच्या प्रक्रियेतही भूमिका बजावते. कोलाजन हे त्वचा, हाडे आणि शरीरातील संयोजी ऊतींसाठी महत्त्वाचे प्रथिन आहे.
पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत
आवळ्यामध्ये आहारातील फायबर असते. पुरेशा प्रमाणात फायबरचे सेवन केल्याने पचनसंस्था निरोगी ठेवण्यास आणि नियमित मलप्रवृत्ती होण्यास मदत होऊ शकते.
बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या व्यक्तींना फायबरयुक्त आहाराचा फायदा होऊ शकतो. मात्र, दीर्घकाळ बद्धकोष्ठता, पोटदुखी किंवा इतर पचनाशी संबंधित समस्या असल्यास केवळ आवळ्यावर अवलंबून न राहता वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ls marathi news channel
केसांसाठी आवळा किती उपयुक्त?
केसांच्या निगेसाठी आवळ्याचा वापर पारंपरिक पद्धतीने केला जातो. आवळ्यातील पोषक घटक एकूण आरोग्यासाठी उपयुक्त असले तरी, आवळा खाल्ल्याने केस गळणे किंवा अकाली पांढरे होणे निश्चितपणे थांबते, असे ठोसपणे म्हणता येत नाही.
केस मोठ्या प्रमाणावर गळत असतील तर शरीरातील काही पोषक घटकांची कमतरता, हार्मोनल बदल, ताणतणाव किंवा इतर कारणे असू शकतात. अशावेळी कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते.
आवळा कसे खावे?
आवळा कच्चा खाण्याबरोबरच त्याचा वापर चटणी, लोणचे, ज्यूस किंवा इतर पदार्थांमध्ये करता येतो. मात्र, आवळ्यापासून तयार केलेल्या प्रत्येक पदार्थाचे पोषणमूल्य सारखे असेलच असे नाही.
उदाहरणार्थ, बाजारातील काही आवळा मुरंबा किंवा तयार ज्यूसमध्ये अतिरिक्त साखर मोठ्या प्रमाणात असू शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी किंवा साखरेचे सेवन नियंत्रित करणाऱ्यांनी असे पदार्थ घेताना लेबलवरील घटक आणि साखरेचे प्रमाण तपासणे महत्त्वाचे आहे.
आवळा
आवळा हा पोषक फळ म्हणून आहारात नक्कीच समाविष्ट करता येतो. मात्र, कोणत्याही आजारावर उपचार करणारे किंवा सर्व समस्या दूर करणारे औषध म्हणून त्याकडे पाहू नये. तसेच नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय उपचार यांसोबत आवळ्याचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करणे हा आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो.




