Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Diesel Rate : डिझेलच्या दरात मोठा फरक; पेट्रोल पंपांवर स्वस्त इंधन मिळत असल्याने कंपन्यांची गर्दी, आता ‘ही’ अट
बिजनेस

Diesel Rate : डिझेलच्या दरात मोठा फरक; पेट्रोल पंपांवर स्वस्त इंधन मिळत असल्याने कंपन्यांची गर्दी, आता ‘ही’ अट

Diesel Rate
26
Diesel Rate : डिझेलच्या किरकोळ आणि घाऊक दरांमध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याने इंधन बाजारात नवी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

पेट्रोल पंपावर मिळणारे डिझेल तुलनेने स्वस्त पडत असल्याने उद्योग, रुग्णालये, हॉटेल्स, डेटा सेंटर्स आणि दूरसंचार क्षेत्रातील मोठे ग्राहकही मोठया प्रमाणात किरकोळ पंपाकडून डिझेल खरेदी करत आहेत.

या वाढलेल्या मागणीचा परिमाण काही पेट्रोल पंपाच्या साठ्यावर होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही खासगी इंधन कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदीवर मर्यादा घालण्यास सुरुवात केली आहे. सामान्य ग्राहकांना इंधनाचा पुरवठा सुरळीत मिळावा, हा या निर्णयामागचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: शेवग्यानंतर आता आवळ्याची चर्चा; रोजच्या आहारात समावेश केल्याने मिळू शकतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

पेट्रोल पंपावर डिझेल खरेदीला मर्यादा

वाढत्या मागणीमुळे काही कंपन्यांच्या पेट्रोल पंपावर एका ग्राहकाला किती डिझेल देता येईल, यावर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जिओ- बीपीच्या काही मेबीलीटी दररोज प्रति ग्राहक ५० लिटरपर्यंत डिझेल देण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे. नायरा एनर्जीच्या काही आउटलेट्सवर ही मर्यादा ठिकाणावर ७० ते २०० लिटर इतकी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्याही परिस्थितीचा आढावा घेत असून भासल्यास अशाच प्रकारच्या उपाययोजना करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डिझेल स्वस्त पाडण्याचे कारण काय?

सध्या किरकोळ आणि घाऊक डिझेलच्या किमतींमध्ये मोठा फरकदिसून येत आहे. पेट्रोल पंपावरील किरकोळ इंधन दर काही काळापासून तुलनेने स्थिर आहेत. मात्र, मोठ्या औद्योगिक ग्राहकांसाठी असलेल्या घाऊक इंधनाच्या किमती आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारातील बदलांनुसार अधिक वेगाने बदलतात.

यामुळे काही परिस्थीतींमध्ये पेट्रोल पंपावरून डिझेल खरेदी करणे मोठ्या ग्राहकांना घाऊक बाजाराच्या तुलनेत स्वस्त पडत आहे. अहवालानुसार, या फरकामुळे प्रति लिटर सुमारे ४० रुपयांपर्यंतची बचत काही ग्राहकांना होत आहे.

मोठ्या ग्राहकांकडून शेकडो लिटर डिझेलची खरेदी

औद्योगिक क्षेत्रातील अनेक ग्राहकांना यंत्रसामग्री, जनरेटर आणि बॅकअप पॉवरसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता असते. त्यामुळे काही ग्राहक पेट्रोल पंपांवर एकाच वेळी शेकडो लिटर इंधन भरत असल्याचे सांगितले जाते.

काही औद्योगिक ग्राहकांकडून एका वेळी ४०० ते ६०० लिटरपर्यंत डिझेल खरेदी केले जात असल्याचे अहवालात नमूद आहे. रुग्णालये, हॉटेल्स, मॉल्स आणि डेटा सेंटर्समध्ये वीजपुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डीजी सेट्समुळेही डिझेलची मागणी मोठी असते. LS Marathi News Channel

पेट्रोल पंपांच्या साठ्यावर दबाव

पेट्रोल पंपांवरील इंधन साठवण क्षमता मर्यादित असते. मोठ्या प्रमाणात डिझेलची विक्री झाल्यास साठा लवकर कमी होतो आणि नवीन पुरवठा येण्यासाठी काही वेळ लागू शकतो.

यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर मर्यादा न घातल्यास सामान्य वाहनचालकांना आवश्यक त्या वेळी डिझेल मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही कंपन्यांनी खरेदीचे प्रमाण नियंत्रित करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

जिओ-बीपी आणि नायरा एनर्जीची स्थिती काय?

जिओ-बीपीकडून त्यांच्या मोबिलिटी स्टेशन्सवर इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे सांगण्यात आले आहे. वाढलेली मागणी लक्षात घेऊन ग्राहकांना इंधनाची व्यापक आणि नियमित उपलब्धता मिळावी यासाठी आवश्यक उपाय केले जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

देशभरात जिओ-बीपीचे २,२२७, तर नायरा एनर्जीचे सुमारे ७,१०५ आउटलेट्स असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशातील एकूण पेट्रोल पंपांची संख्या सुमारे १.०४ लाख असून, यामध्ये सरकारी तेल कंपन्यांचा मोठा वाटा आहे.

पुढे काय होणार?

किरकोळ आणि घाऊक डिझेलच्या किमतींमधील मोठा फरक कायम राहिल्यास मोठ्या प्रमाणावर इंधन वापरणाऱ्या कंपन्यांचा पेट्रोल पंपांकडे कल कायम राहू शकतो. त्यामुळे काही भागांमध्ये पेट्रोल पंपांच्या डिझेल साठ्यावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

सध्या कंपन्यांचे लक्ष सामान्य ग्राहकांसाठी इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यावर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती, देशांतर्गत इंधन दर आणि घाऊक-किरकोळ किंमतीतील तफावत यामुळे आगामी काळात डिझेलच्या बाजारपेठेवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts