Navratri 2026 : शारदीय नवरात्रीच्या उत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे.
यंदा ११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव (Navratri 2026) सुरू होणार असून २० ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाईल. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, नऊ दिवस कोणत्या देवीची पूजा केली जाणार आणि अष्टमी- नवमीसह.महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या.
शारदीय नवरात्रीच्या (Sharad Navratri 2026) उत्सवाची भक्तांना आतुरता लागली आहे. नवरात्रीचे नऊ दिवस (Navratri Panchang 2026) देवीच्या विविध रूपांची आराधना केली जाते. यंदा नवरात्रीची सुरुवात नेमकी १० की ११ ऑक्टोबरला होणार, याबाबत संभ्रम आहे. हिंदू पंचांगानुसार याची तिथी आणि घटस्थापनेचा मुहूर्त जाणून घेणे महत्वाचे आहे.
हेही वाचा: ‘नाद नाही करायचा माझा’; पूर्णेकर प्रकरणावर सुषमा अंधारेंचा इशारा, नितेश राणेंवर जोरदार टीका
११ ऑक्टोबरला नवरात्रीचा पहिला दिवस
पंचांगानुसार अश्विन शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी १० ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजून १९ मिनिटांनी सुरू होईल आणि ११ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी समाप्त होईल.
उदय तिथीचा नियम लक्षात घेतल्यास यंदा ११ ऑक्टोबर २०२६ रोजी नवरात्रीचा पहिला दिवस मानला जाणार आहे. याच दिवशी देवीची स्थापना करून नऊ दिवसांच्या उत्सवाला सुरुवात होईल.
घटस्थापनेसाठी शुभ वेळ कोणती?
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ११ ऑक्टोबरला घटनस्थपना केली जाईल.
घस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी ६ वाजून ३२ मिनिटांपासून ते १० वाजून २६ मिनिटांपर्यंत आहे. या वेळेत पूजा करणे शक्य नसल्यास दुपारी 12:02 ते 12:48 या अभिजीत मुहूर्तातही घटस्थापना करता येऊ शकते. स्थानिक सूर्योदय आणि पंचांगानुसार मुहूर्तात काही फरक असू शकतो, त्यामुळे आपल्या शहरानुसार पंचांग पाहणे योग्य ठरेल.
नऊ दिवस कोणत्या देवीची आराधना केली जाणार?
नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीच्या एका विशिष्ट स्वरूपाची पूजा केली जाते. यंदाच्या नवरात्रीतील पूजेचे दिवस पुढीलप्रमाणे आहेत:
11 ऑक्टोबर – देवी शैलपुत्री
12 ऑक्टोबर – देवी ब्रह्मचारिणी
13 ऑक्टोबर – देवी चंद्रघंटा
14 ऑक्टोबर – देवी कूष्मांडा
15 ऑक्टोबर – देवी स्कंदमाता
16 ऑक्टोबर – देवी कात्यायनी
17 ऑक्टोबर – देवी कालरात्री
18 ऑक्टोबर – देवी कालरात्री
19 ऑक्टोबर – देवी महागौरी आणि सिद्धिदात्री
सप्तमी दोन दिवस; अष्टमी-नवमी एकाच दिवशी
यंदाच्या पंचांगानुसार सप्तमी तिथी दोन दिवस येत असल्याने 17 आणि 18 ऑक्टोबरला सप्तमी तिथी राहणार आहे.
यानंतर 19 ऑक्टोबरला अष्टमी आणि नवमीचे पूजन केले जाईल. याच दिवशी कन्या पूजनासह नवरात्रीच्या धार्मिक कार्यक्रमांची सांगता होईल.
20 ऑक्टोबरला दसरा
नवरात्री संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 ऑक्टोबर 2026 रोजी विजयादशमी (Vijayadashami 2026) अर्थात दसरा साजरा केला जाणार आहे.
दसरा हा हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी (Dussehra 2026) एक असून, या दिवशी शस्त्रपूजा, सीमोल्लंघन आणि विविध धार्मिक परंपरा पाळल्या जातात.
यंदा देवीचे आगमन कोणत्या वाहनावर?
धार्मिक मान्यतेनुसार देवीचे आगमन आणि प्रस्थान कोणत्या वाहनावर होते, यालाही विशेष महत्त्व दिले जाते.
यंदा नवरात्रीची सुरुवात रविवारी होत असल्याने देवीचे आगमन हत्तीवरून (Navratri Festival) होणार असल्याचे ज्योतिषीय परंपरेत मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार हत्ती हे समृद्धी, स्थैर्य आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे देवीचे हत्तीवर आगमन शुभ संकेत मानले जात आहे.









