Breaking News :
  • Home
  • संस्कृती
  • नवरात्राच्या नऊ दिवसांत काय करावे अन् काय करू नये? जाणून घ्या एका क्लिकवर
लाईफस्टाईल

नवरात्राच्या नऊ दिवसांत काय करावे अन् काय करू नये? जाणून घ्या एका क्लिकवर

Navratri 2026 Rules
Navratri 2026 Rules: यंदा नवरात्रोत्सवाला ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीचे हे नऊ दिवस हिंदू धर्मात विशेष महत्त्वाचे मानले जातात. या काळात अनेक भाविक देवीची स्थापना केल्यापासून ते विसर्जनापर्यंत उपवास आणि व्रत करतात. तुम्हीही नवरात्रीत उपवास करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खास आहे.

Navratri Do’s and Don’ts: यंदा नवरात्रोत्सवाला ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून, देशभरात देवीच्या आराधनेची तयारी सुरू झाली आहे. नवरात्रीचे हे नऊ दिवस हिंदू धर्मात श्रद्धा, उपासना आणि आत्मसंयमाचा काळ मानले जातात. या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा करण्यासोबतच अनेक भाविक उपवास, जप, ध्यान आणि धार्मिक विधी (Navratri 2026 Rules) करतात. काहीजण संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात, तर काहीजण ठराविक दिवशी व्रत पाळतात. मात्र, उपवास करताना केवळ आहारावर नियंत्रण ठेवणे पुरेसे नसून काही धार्मिक प्रथा आणि नियमांचे पालन करण्यालाही महत्त्व दिले जाते. तुम्हीही यंदा नवरात्रीचे व्रत करणार असाल, तर काय करावे, काय टाळावे ( Navratri Do and Donts) आणि कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

नवरात्रात ‘हे’ करा, ‘या’ गोष्टी टाळा!

१. देवीची मनोभावे पूजा करा

नवरात्रात दररोज देवीची पूजा, आरती आणि नामस्मरण करण्याची परंपरा आहे. शक्य असल्यास सकाळ-संध्याकाळ देवीसमोर दिवा लावून प्रार्थना करावी.

२. सात्त्विक आहार घ्या

उपवास करणाऱ्यांनी आपल्या परंपरेनुसार फळे, दूध, दही, साबुदाणा, राजगिरा, शिंगाडा यांसारखे उपवासाचे पदार्थ घेऊ शकतात. कांदा-लसूण, मांसाहार आणि मद्यपान टाळण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे.

३. कुमारिका पूजनाला महत्त्व

अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कुमारिका पूजन करून मुलींना भोजन देण्याची परंपरा आहे. त्यांना देवीचे रूप मानून आदराने भोजन किंवा फलाहार दिला जातो.

४. महिलांचा सन्मान करा

नवरात्र हा शक्तीच्या उपासनेचा उत्सव असल्याने महिलांचा आदर करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. कोणत्याही महिलेशी अपमानास्पद किंवा कटू भाषेत बोलणे टाळावे.

५. केस आणि नखे कापणे टाळण्याची प्रथा

काही धार्मिक परंपरांमध्ये नवरात्राच्या काळात केस आणि नखे न कापण्याचा नियम पाळला जातो. मात्र, ही प्रथा सर्वत्र सारखी नसून कुटुंब आणि प्रदेशानुसार त्यात फरक आढळतो.

६. खोटे बोलणे आणि वाद टाळा

नवरात्रात मन आणि वाणीवर संयम ठेवण्याचा सल्ला दिला जातो. खोटे बोलणे, शिवीगाळ करणे, विनाकारण वाद घालणे किंवा इतरांना दुखावणे टाळावे.

७. व्यसनांपासून दूर राहा

धार्मिक श्रद्धेनुसार नवरात्रात मद्यपान, धूम्रपान आणि इतर व्यसनांपासून दूर राहणे योग्य मानले जाते. या काळात शरीर आणि मन शुद्ध ठेवण्यावर भर दिला जातो.

८. राग आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा

नवरात्र केवळ उपवासाचा नव्हे, तर आत्मसंयम आणि साधनेचा काळ मानला जातो. त्यामुळे राग, मत्सर आणि नकारात्मक विचार दूर ठेवून शांत आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करावा.

९. गरजूंना मदत करा

नवरात्रात दानधर्म आणि गरजू व्यक्तींना मदत करण्याचीही परंपरा आहे. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा इतर स्वरूपात मदत करता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts