Breaking News :
  • Home
  • Top News
  • पुण्यात वर्षभरापूर्वी झालेल्या घरफोडीचा छडा! वानवडी पोलिसांकडून पाच आरोपींना अटक; साडेसात लाखांचे सोने जप्त
गुन्हा

पुण्यात वर्षभरापूर्वी झालेल्या घरफोडीचा छडा! वानवडी पोलिसांकडून पाच आरोपींना अटक; साडेसात लाखांचे सोने जप्त

Wanawadi Police Pune
4

अमोल धर्माधिकारी | Pune Westin Beuro Head

Wanawadi Police Pune : पुण्यातील वानवडी परिसरात वर्षभरापूर्वी घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात वानवडी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे साडेसात लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे.

या गुन्ह्यात धीरज उर्फ रंधा सावंत आणि विशाल लोखंडे यांच्यासह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी घडलेल्या या घरफोडीच्या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.

वानवडी पोलिसांची कारवाई; साडेसात लाखांचे सोने जप्त ( Wanawadi Police Pune )

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे आणि पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांनी केला. त्यानंतर शशिकांत लोंढे आणि वानवडी पोलिसांच्या पथकाने पुढील तपास करत आरोपींना अटक केली. या कारवाईत सुमारे साडेसात लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास वानवडी पोलीस करत असून, घरफोडीशी संबंधित इतर बाबींचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts