Railway NTPC Recruitment 2026: रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे NTPC भरती २०२६ अंतर्गत १६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी कोण पात्र आहे आणि वयोमर्यादा किती आहे. चला तर जाणून घेऊयात आजच्या खास लेखात.
Railway NTPC Recruitment 2026: भरतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळामार्फत ( RRB ) १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी NTPC अंडरग्रॅज्युएट स्तरावरील भरती जाहीर (RRB NTPC Vacancy 2026) करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण १६८८ पदे भरण्यात येणार असून, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू (Railway NTPC Eligibility Criteria) झाली आहे.
पात्र उमेदवारांना १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज(12th Pass Railway Jobs) करता येणार आहे. या भरतीमध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्क, ट्रेन क्लर्क, ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट आणि अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट ( Job Vacancy 2026) या पदांचा समावेश आहे.
भरतीचा संक्षिप्त तपशील
भरती संस्था: रेल्वे भरती मंडळ (RRB)
भरतीचे नाव: NTPC अंडरग्रॅज्युएट लेव्हल भरती २०२६
एकूण रिक्त पदे: १,६८८
शैक्षणिक पात्रता: १२वी उत्तीर्ण
अर्ज सुरू होण्याची तारीख: १५ ऑक्टोबर २०२६
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १३ नोव्हेंबर २०२६
अर्ज पद्धत: ऑनलाइन
अधिकृत संकेतस्थळ: rrb.indianrailways.gov.in
कोणत्या पदांसाठी भरती होणार?
या भरतीअंतर्गत विविध विभागांमध्ये पुढीलप्रमाणे जागा उपलब्ध आहेत.
पदाचे नाव रिक्त जागा
कमर्शियल कम तिकीट क्लर्क ७००
ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट ६००
अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट २००
ट्रेन क्लर्क १८८
एकूण १,६८८
प्रवर्गानुसार जागांचे वर्गीकरण
जाहीर करण्यात आलेल्या रिक्त पदांमध्ये विविध प्रवर्गांसाठी आरक्षणाची तरतूद आहे.
खुला प्रवर्ग (UR): ६८६ पदे
इतर मागासवर्ग (OBC): ४१४ पदे
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS): १६३ पदे
अनुसूचित जाती (SC): २५८ पदे
अनुसूचित जमाती (ST): १६७ पदे
शैक्षणिक पात्रता काय असावी?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून बारावीची परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे बारावीमध्ये किमान ५० टक्के एकूण गुणांची अट नमूद करण्यात आली आहे.
मात्र, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग उमेदवार, माजी सैनिक आणि पदवी किंवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना नियमानुसार ५० टक्के गुणांची अट लागू नसू शकते.
बारावीचा अंतिम निकाल अद्याप लागलेला नसलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचनेतील पात्रतेच्या अटी तपासाव्यात. अंतिम मुदतीपर्यंत आवश्यक पात्रता पूर्ण असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवारांचे वय १ जानेवारी २०२७ रोजी मोजले जाणार आहे.
किमान वय: १८ वर्षे
कमाल वय: ३० वर्षे
पात्र जन्मतारीख: २ जानेवारी १९९७ ते १ जानेवारी २००९
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. SC/ST उमेदवारांना पाच वर्षे, तर OBC प्रवर्गातील पात्र उमेदवारांना तीन वर्षांची सवलत मिळू शकते.
हेही वाचा: या ५ राशींना मिळू शकते मोठी संधी; तर कोणत्या राशींनी घ्यावी काळजी? एकदा वाचा!
निवड प्रक्रिया कशी असेल?
रेल्वे NTPC भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रामुख्याने पुढील टप्प्यांद्वारे केली जाईल:
१. प्रथम संगणक-आधारित परीक्षा (CBT-1)
२. द्वितीय संगणक-आधारित परीक्षा (CBT-2)
३. कागदपत्रांची पडताळणी
ज्या पदांसाठी टायपिंग कौशल्य चाचणी लागू असेल, त्या पदांसाठीची अट अधिकृत अधिसूचनेनुसार तपासणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा?
१. रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
२. NTPC Undergraduate Level Recruitment 2026 संबंधित अधिसूचना शोधा.
३. ऑनलाइन अर्जाची लिंक उघडून आवश्यक माहिती भरा.
४. मागितलेली कागदपत्रे आणि छायाचित्रे नियमानुसार अपलोड करा.
५. लागू असलेले अर्ज शुल्क भरा.
६. अर्ज अंतिम स्वरूपात सबमिट करून त्याची प्रत जतन करा.




